प्रधानमंत्री फसल बिमा योजना | प्रधानमंत्री पिक विमा योजना | Prime Minister’s Crop Insurance Scheme

प्रधानमंत्री फसल बिमा योजना | प्रधानमंत्री पिक विमा योजना

भारत हा कृषी प्रधान देश असून भारतातील बहुतांश लोंकचा व्यवसाय हा शेती आहे. भारता मधील बऱ्याच भागांमध्ये शेती ही मान्सुनवर अवलंबून राहून केली जाते. बरेच वेळा कमी पावसामूळे तर कधी-कधी अती पावसामूळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. सदर चे नुकसान शेतकऱ्यांना जादा होवू नये तसेच शेतकरी यांना नुकसान भरपाई लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा काढण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने प्रधानमंत्री फसल बिमा योजना ज्याला मराठी मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना असे संबोधले जाते.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा उद्देश :-

1.पिकांवरील किड व रोंगामूळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना विमा संरक्षण देणे.
2.नैसर्गिक आपत्तीमूळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना विमा संरक्षण देणे.
3.शेतीमध्ये टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे.
4.शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
5.कृषी क्षेत्राला पतपुरवठा करत राहणे ,ज्यामुळे अन्नसुरक्षा लाभेल ,पीक पद्धतीत  बदल होईल ,कृषी क्षेत्रात स्पर्धात्मकता येऊन कृषी तंत्राची वाढ होईल

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्टये :- 

1.शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक योजना.
2.ऑनलाईन असल्याने रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
3.शेतकरी प्रिमियम ची रक्कम अत्यंत कमी फक्त 2%
4.100% खात्रीशिर संरक्षण मिळते.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे प्रिमियम व लाभ :-

1.बागायती  पिकांसाठी एकूण विमा संरक्षण रक्कमेच्या 5% रक्कम भरणा करावी लागते.
2.खरीप पिकांसाठी एकूण विमा संरक्षण रक्कमेच्या 2% रक्कम भरणा करावी लागते.
3.रब्बी पिकांसाठी एकूण विमा संरक्षण रक्कमेच्या 1.5% रक्कम भरणा करावी लागते.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :- 

1.आधार कार्ड
2.बँकेचे पासबूक
3.शेतीचा 7/12
4. शेतीचा 8 अ
5.पिक पेरणी प्रमाणपत्र
6.शेती भाडे तत्वावर दिली असल्यास शेतीचा भाडे करार

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी संपर्क कार्यालय :-

1.जवळचे तलाठी कार्यालय / कृषी अधिकारी कार्यालय
2.राष्ट्रीयकृत व सहकारी बँका

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या ऑनलाईन अर्जाची लिंक :- https://pmfby.gov.in/

_________________________________________________________________________________

Prime Minister’s Crop Insurance Scheme

India is the leading agricultural country and most of India’s business is agriculture. In most parts of India, agriculture is dependent on monsoon. Often due to short rains, sometimes heavy rains cause major damage to crops. In order not to overburden the damage to the farmers as well as to compensate the farmers for the benefit of the farmers, the Central Government has introduced the Prime Minister’s Crop Insurance Scheme, which is known as the Prime Minister’s Crop Insurance Scheme in Marathi.

Purpose of the Prime Minister’s Pic Insurance: –

1. To provide insurance cover to the farmers in case of damage to pests and pests.
2. To provide insurance cover to farmers in case of natural disaster.
3. Stabilize the income of the farmers to survive in agriculture.
4. Encourage farmers to use innovative and improved cultivation technologies and materials.
5. Keeping credit to the agricultural sector, which will lead to food security, changes in crop system, competitiveness in agriculture and increased agricultural technology.

Features of the Prime Minister’s PIC Insurance Scheme:-

1. Very profitable scheme for farmers.
2. Being online doesn’t have to stand in line.
3. Farmer premium amount extremely low only 2%
4.100% guaranteed protection.

Premiums and Benefits of Prime Minister’s Insurance Scheme: –

1. For pigeon crops 5% of the total insurance cover amount has to be paid.
2. For most crops, 2% of the total insurance cover amount has to be paid.
3. Rabi crops have to pay 1.5% of the total insurance cover amount.

Documents Required for PM Pickup Insurance Scheme: –

1. Aadhar card
2. Bank passbook
3. Agriculture 7/12
4. 8 a
5. Sowing Certificate
6. Agricultural lease agreement if farm rent is paid on a lease basis

Contact Office for the Prime Minister’s Pickup Insurance Scheme: –

1. Near Talathi Office / Agricultural Officer Office
2. Nationalized and Co-operative Banks

Link to Online Application of PM Pickup Insurance Scheme: – https://pmfby.gov.in/

Leave a Comment