सामूहीक शेततळे | Samuhik Shet Tale

सामूहीक शेततळे 

           

सामूहिक तलावाचे प्रकार

लाभार्थी निवडीचे निकष

प्लॅस्टिक फिल्म बसविताना घ्यावयाची काळजी
अनुदान वितरित करण्याची पद्धत
सामूहिक शेततळे तयार करण्यासाठी खर्चाचे मापदंड

          

शेततळे करताना…

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सामूहिक शेततळे ही योजना 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. पाण्याचे स्रोत निर्माण करणे व साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये आणि पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून त्या तलावास योग्य दर्जाच्या प्लॅस्टिक फिल्मचे अस्तरीकरण करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत.
Mahayojana
mahayojana.com

सामूहिक तलावाचे प्रकार

1) मॉडेल क्र. 1 ः 2 मी. खोदकाम व 3 मी. बांधाची उंची (Half Dugout)
2) मॉडेल क्र. 2 ः पूर्णपणे खोदकाम करून करावयाचे शेततळे (Fully Dugout)
3) मॉडेल क्र. 3 ः बोडी टाईप सामूहिक शेततळे (Bodi Type)
सामूहिक शेततळ्यातील पाण्याचा उपयोग लाभार्थींनी फळपिकांच्या सिंचनाकरिता करणे अपेक्षित आहे.

सामूहीक शेततळे योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष

सामूहिक शेततळ्याचा लाभ लहान शेतकरी, आदिवासी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्याने देणे अपेक्षित आहे.
योजना राबविताना अनुसूचित जाती (16 टक्के), अनुसूचित जमाती (8 टक्के), आदिवासी, महिला (30 टक्के), लहान शेतकरी इत्यादींना प्राधान्याने नियमाप्रमाणे लाभ देण्यात यावा.
लाभार्थी संयुक्त कुटुंबातील नसावेत. ते वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत. तसेच त्यांचे जमीनधारणेबाबतचे खातेउतारे स्वतंत्र असावेत.
शेततळ्यातील पाणी वापरण्यासाठी अधिकाधिक कार्यक्षमता असलेल्या सिंचन पद्धतीचा (ठिबक, तुषार इत्यादी) वापर करणे बंधनकारक आहे.
जेवढे क्षेत्र सध्या समूहामध्ये फळपिकाखालील असेल, तेवढ्या क्षेत्रासाठीच सामूहिक शेततळे देण्यात येईल.
ज्या शेतकऱ्यांनी 2005-06 नंतर फळबाग लागवड केलेली असेल, अशा लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
लाभार्थी समूहाकडे फळबाग लागवड असणे आवश्‍यक आहे. भविष्यात होणाऱ्या फळबाग लागवडीचा विचार करण्यात येऊ नये.
सामूहिक शेततळ्याचा वापर दोन अथवा अधिक लाभार्थ्यांनी करावा.
सामूहिक शेततळ्याचे ठिकाण फळपिकाच्या लाभक्षेत्राच्या नजीक असावे, त्यामुळे तलावातील पाणी कमीत कमी कष्टांत व खर्चामध्ये संपूर्ण फळबाग क्षेत्रास देता येईल.
शेततळ्यातील पाणीवापराबद्दल तसेच शेततळ्याच्या जमिनीबद्दल लाभार्थ्यांमध्ये आपसामध्ये सामंजस्याचा करार प्रपत्र-7 नुसार करावा.
शेततळ्याचा वापर अपेक्षित पद्धतीने करण्यात येईल, असा शेतकऱ्यांनी शासनाकडे प्रपत्र-8 नुसार करार करावा.

प्लॅस्टिक फिल्म बसविताना घ्यावयाची काळजी –

शेततळ्यातील पाणी जमिनीमध्ये जिरून वाया जाऊ नये म्हणून विशेष प्रकारच्या प्लॅस्टिक फिल्मचा (रीइनफोर्सड्‌ जीओ मेंबरेन फिल्म IS:15351:2008 या दर्जाची) लायनिंगसाठी योग्य प्रकारे उपयोग करावा.
सामूहिक बोडी प्रकारच्या शेततळ्यामध्ये लायनिंग करणे अपेक्षित नाही.
शेततळ्यातील पाण्याच्या वापराबाबत रूपरेषा प्रथम निश्‍चित केली जावी.
सामूहिक शेततळ्याचा लाभ समूहाकडील पूर्वी लागवड केलेल्या फलोत्पादन पिकांसाठी देण्यात येईल.
फिल्म शेततळ्याच्या काठापासून बंद (अँकरिंग) करून संपूर्ण शेततळ्यात अशा प्रकारे बसवावी, की ज्यामुळे फिल्म पाण्याच्या वजनामुळे खाली घसरणार नाही व शेततळ्यातील साठलेले पाणी जमिनीमध्ये मुरणार नाही.
फिल्म शेततळ्यामध्ये योग्य प्रकारे जोडून घ्यावी.
मंजूर क्षमतेच्या आकारमानापेक्षा प्रत्यक्ष खोदाई जास्त केली जाते. त्यामुळे अस्तरीकरणासाठी लागणाऱ्या जादा फिल्मची किंमत देण्यास लाभार्थी तयार नसतात. त्यामुळे निर्धारित आकारमानापेक्षा जास्त खोदाई होणार नाही याची काळजी घ्यावी. जर लाभार्थी मोठ्या आकारमानाचे शेततळे घेऊ इच्छित असेल, तर त्यासाठी जास्तीचा येणारा खर्च लाभार्थीला करावा लागेल याची जाणीव करून देण्यात यावी.

सामूहीक शेततळे योजनेसाठी अनुदान वितरित करण्याची पद्धत  –

अ) पहिला टप्पा ः मातीकाम

मातीकाम पूर्ण झाल्यावर 8 दिवसांच्या आत मापनपुस्तिका नोंदणीसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अनुदान वितरित करण्यासाठी पाठविणे आवश्‍यक आहे. खोदकामाचे अनुदान वितरण करताना खोदकामाच्या मंजूर रकमेच्या 80 टक्के अनुदान वितरित करावे.

ब) दुसरा टप्पा ः काटेरी तारेचे कुंपण करणे

काटेरी तारेचे कुंपण पूर्ण झाल्यावर 8 दिवसांच्या आत मापनपुस्तिका नोंदणीसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अनुदान वितरित करण्यासाठी पाठविणे आवश्‍यक आहे. काटेरी तारेच्या कुंपणासाठी अनुदान वितरण करताना कुंपणासाठी देय असलेली पूर्ण रक्कम लाभार्थीला देण्यात यावी.

क) तिसरा टप्पा ः फिल्म अस्तरीकरण करणे

फिल्म अस्तरीकरण पूर्ण झाल्यावर 8 दिवसांच्या आत मापनपुस्तिकेत नोंद घेऊन या बाबीसाठी मंजूर असणारे पूर्ण अनुदान (100 टक्के) वितरण करण्यात यावे.

ड) चौथा टप्पा ः शेततळ्यात पाणी भरल्यानंतर

– शेततळ्यामध्ये पाणी भरल्यावर खोदकामाचे उर्वरित 20 टक्के देय अनुदान वितरित करण्यात येते.
वरील सर्व टप्प्यांतर्गत देय अनुदान शेतकरी समूहाच्या सामूहिक बॅंक खात्यावर जमा केली जाते.
एम.एन.आर.ई.जी.एस. अंतर्गत खोदलेल्या शेततलावास फिल्टरेशन युनिट बसविणे लाभार्थ्यांना बंधनकारक आहे.

सामूहिक शेततळे तयार करण्यासाठी खर्चाचे मापदंड –

1) सामूहिक शेततळ्याचा आकार उपलब्ध क्षेत्रीय परिस्थितीनुसार ठरविण्यास लाभार्थ्यांना मुभा राहील. सामूहिक शेततळ्यासाठी पुढील तीन मॉडेल्स राबवायची आहेत. त्यासाठी पाणीसाठा क्षमता आणि अनुदान मर्यादा पुढीलप्रमाणे राहील ः
1.1 जमिनीच्या वर बांध घालून पाणीसाठा करावयाचे सामूहिक शेततळे (Half Dugout)
सामूहिक शेततळ्यामुळे जमिनीचे कमीत कमी क्षेत्रफळ व्यापले जावे, तसेच पाण्याचा पसारा कमी ठेवल्यामुळे बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान कमी होण्यासाठी पूर्ण भरलेल्या शेततळ्यातील पाण्याची उंची सुमारे पाच मीटर असावी.
बांधासहित व बांधाविरहित 10,000 घनमीटर (प्रपत्र- 5 अ), 8000 घनमीटर (प्रपत्र – 5ब), 6000 घनमीटर (प्रपत्र – 5 क), 5000 घनमीटर (प्रपत्र – 5 ड), 4000 घनमीटर (प्रपत्र – 5 इ), 3000 घनमीटर (प्रपत्र – 5 ई), 2000 घनमीटर (प्रपत्र – 5 फ) घनमीटर साठवण क्षमतेच्या शेततळ्याच्या खोदाईसाठी नैसर्गिक सखलतेचा विचार करून शेततळ्याची खोली 1 ते 3 मीटरपर्यंत गृहित धरलेली आहे.
सामूहिक शेततळ्यासाठी वाहून जाणारे पाणी जमा करण्यासाठी इनलेट, जादाचे पाणी वाहून जाण्यासाठी आऊटलेट करावे.
या प्रकारच्या सामूहिक शेततळ्यामध्ये वाहून जाणारे पाणी साठविणे अपेक्षित असल्यामुळे वाहून येणाऱ्या पाण्यातील गाळ शेततळ्यामध्ये जाऊ नये म्हणून फिल्टरेशन टॅंक तयार करणे आवश्‍यक आहे. फिल्टरेशन टॅंक तयार करण्याकरिता 2x2x2 मी. आकाराचा खड्डा करून त्यामधून पाणी वाहून जाण्याची सोय करावी. जेणेकरून पाण्यातील गाळ त्या खड्ड्यामध्ये बसून राहील व गाळणी केलेले पाणी शेततळ्यामध्ये जाईल. त्यामुळे अस्तरीकरण केलेल्या प्लॅस्टिक शीटवर गाळ साचणार नाही.
अशा प्रकारच्या फिल्टरेशन टॅंकमध्ये वरच्या थरात 50 ते 100 मिलिमीटर जाडीची खडी, मधल्या थरात 5 ते 10 मिलिमीटर जाडीची बारीक खडी आणि सर्वांत खालच्या थरामध्ये 2 ते 4 मिलिमीटर जाडीची वाळू वापरणे आवश्‍यक आहे. या फिल्टरेशन टॅंकसाठी सुमारे रुपये 10,000 खर्च अपेक्षित आहे.
याशिवाय पाणी गाळण्यासाठी शेतकऱ्याने दुसरी व्यवस्था केली असल्यास त्यास हरकत नाही. तथापि वाहून येणाऱ्या पाण्यातील गाळ सामूहिक शेततळ्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा प्रकारच्या शेततळ्यामध्ये बांधासहित व बांधाविरहित अशा दोन्हीही प्रकारच्या सामूहिक शेततळ्याचे अंदाजपत्रक दिलेले आहे.
वाहून जाणारे पाणी साठवणूक करून पूर्णपणे खोदाई केलेल्या सामूहिक शेततळ्यामध्ये पाण्याची उंची 3.10 मीटर ठेवण्यात यावी.
2500, 5000, 7500, 10,000, 12,500 व 15,000 घनमीटर साठवणूक क्षमतेचे बोडी टाईप सामूहिक शेततळे बांधणे आवश्‍यक आहे.
बोडी टाईप सामूहिक शेततळ्याचे बांधकाम हे पूर्ण खोदाई केलेल्या सामूहिक शेततळ्याप्रमाणे आहे. मात्र यामध्ये जमीन स्तरापासून जास्तीत जास्त खोली एक मीटर गृहित धरलेली आहे.
यापूर्वी खोदाई केलेल्या बोडींना या अभियानात अनुदान देय नाही, याची नोंद घ्यावी.
बोडी टाईपच्या सामूहिक शेततळ्यासाठी प्लॅस्टिक शीट अस्तरीकरण करणे अपेक्षित नाही. त्यामुळे अंदाजपत्रकामध्ये याचा समावेश करण्यात आलेला नाही.
बोडी टाईपमध्ये बांधाची उंची 1.3 मीटर असावी.

शेततळे करताना…

शेततळ्यासाठी निश्‍चित केलेल्या जागेवर मजुराद्वारा अथवा आवश्‍यक ती यंत्रसामग्री वापरून योग्य त्या क्षमतेचा जलसाठा तयार करावा.
शेततळ्याचे क्षेत्रफळ साठवणूकक्षमतेप्रमाणे निश्‍चित करावे.
प्रस्तावित जागेमध्ये खोदाई करून काढलेली माती शेततळ्याच्या आकारानुसार लावून व दबाई करून बांध बनविण्यात यावा.
सदर शेततळ्यासाठी वापरावयाची फिल्म एचडीपीई रिइन्फोर्सड जीओ मेंबरेन 500 मायक्रॉन जाडीची (IS:15351:2008) असावी.
शेततळ्याचे खोदकाम, बांधकाम, फिल्म बसविणे वगैरे कामे तांत्रिक स्वरूपाची असल्याने शेतकऱ्यांनी शक्‍यतो या कामातील अनुभवी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करून घ्यावीत.
सामूहिक शेततळ्याबाबत संपूर्ण माहिती सांगणारा 3×2 फूट आकाराचा खालील मजकुराचा पक्का बोर्ड शेततळ्याजवळ लावावा.
शेततळ्यामध्ये उतरण्यासाठी योग्य आकाराची शिडी असावी. तथापि, बोडी टाईप सामूहिक शेततळ्यामध्ये याची आवश्‍यकता नाही.
मॉडेल क्र. 1 च्या शेततळ्यामध्ये पाणी भरण्याची स्वतंत्र सुविधा लाभार्थीने करणे आवश्‍यक आहे. तथापि, पूर्णपणे खोदाई केलेल्या शेततळ्यासाठी व बोडी टाईपच्या शेततळ्यासाठी नैसर्गिक पद्धतीने पाणी वळवून घेण्यात यावे.
सामूहिक शेततळ्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणी भरल्यास जास्तीचे पाणी आपोआप वाहून जाण्याची सोय असावी.
या घटकासाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत अनुदान घेतलेले नसावे.
सामूहिकरीत्या शेतकऱ्यांनी शेततळे तयार करण्यासाठी निर्णय घेतल्यानंतर सर्व सभासदांनी संबंधित तालुक्‍याचे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सोबतच्या विहीत प्रपत्र-1 नुसार अर्ज करून त्यांना सामूहिक शेततळ्यासाठी अनुदान देण्याबाबत विनंती करावी. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यापूर्वी ज्या क्षेत्रावर सामूहिक शेततळे तयार करावयाचे आहे त्या ठिकाणी ट्रायल पीट घ्यावा.

सामूहीक शेततळे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –

1.शेतकऱ्याचा अर्ज
2.जमिनीच्या मालकीसंबंधी 7/12, 8-अ उतारे 
3.पाणी, जमीन वापराबाबतचा आपसांतील सामंजस्य करार (प्रपत्र-7) रुपये 100/- च्या स्टॅम्पपेपरवरील (नोंदणीकृत) सादर करावा.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची मंजुरी प्राप्त होताच शेततळ्याचे काम सुरू करावे. सदर काम सुरू केल्यापासून तीन महिन्यांत पूर्ण करावे.
शेततळ्याचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकरीसमूहाने तालुका कृषी अधिकारी यांना कळवावे. त्यानंतर संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित तालुका कृषी अधिकारी व संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार त्या टप्प्यापर्यंत मंजूर असलेले अनुदान अदायगीसाठी शिफारस करावी.
स्त्रोत: अग्रोवन


Samuhik Shet tale

Types of samuhik shet tale

Beneficiary selection criteria

Care to be taken while installing plastic film

Method of distribution of grants

Expenditure criteria for setting up samuhik shet tale

While farming …

Under the National Horticulture Mission, the samuhik shet tale scheme is being implemented on 100 per cent subsidy. There are instructions from the central government to cover the pond with suitable quality plastic film so that water sources are created and stored water is not wasted and stored water is used to sustain orchards in times of water scarcity.

mahayojana


Types of Samuhik Shet Tale –

1) Model no. 1: 2m. Excavation and 3 m. Half Dugout

2) Model no. 2: Fully Dugout

3) Model no. 3: Body Type samuhik shet tale (Bodi Type)

Beneficiaries are expected to use samuhik shet tale water for irrigation of fruit crops.

Beneficiary Selection Criteria for Samuhik Shet tale Scheme :-

The benefit of collective farming is expected to be given priority to small farmers, tribal and backward class farmers.

While implementing the scheme, priority should be given to Scheduled Castes (16 per cent), Scheduled Tribes (8 per cent), Tribals, Women (30 per cent), Small Farmers etc. as per rules.

Beneficiaries should not be from a joint family. They must be from different families. Also their land holding accounts should be independent.

It is mandatory to use high efficiency irrigation system (drip, sprinkler etc.) to use farm water.

Samuhik shet tale will be allotted for the area currently under fruit cultivation in the group.

Preference will be given to farmers who have planted orchards after 2005-06.

Beneficiary group must have orchard cultivation. Future orchards should not be considered.

Samuhik shet tale should be used by two or more beneficiaries.

The location of the collective farm should be close to the benefit area of ​​the orchard, so that the water from the pond can be supplied to the entire orchard area with minimum effort and cost.

A Memorandum of Understanding between the beneficiaries regarding the use of farm water and farm land should be made as per Form-7.

Farmers should enter into an agreement with the government as per Form-8 that the farm will be used in the expected manner.

 

Care to be taken while installing plastic film –

A special type of plastic film (Reinforced Geo Membrane Film IS: 15351: 2008) should be used properly for lining so that farm water is not wasted in the soil.

Lining is not expected in collective body type farms.

Outline of farm water use should be determined first.

The benefit of collective farming will be given for horticulture crops previously planted by the community.

The film should be anchored from the edge of the field and placed in the entire field in such a way that the film does not slide down due to the weight of water and the water stored in the field does not seep into the soil.

The film should be properly attached to the farm.

The actual excavation is done in excess of the sanctioned capacity. Therefore, the beneficiaries are not willing to pay for the extra film required for lining. Therefore, care should be taken not to dig more than the prescribed size. If the beneficiary wants to acquire large scale farms, the beneficiary should be made aware that he / she will have to incur extra cost for the same.

 

Method of disbursement of subsidy for collective farm scheme –

A) The first stage: pottery

Within 8 days after completion of earthworks, measurement book along with registration should be sent to the office of the District Superintendent of Agriculture for distribution of grants. 80 per cent of the sanctioned amount of excavation should be disbursed while distributing excavation grants.

B) Second stage: barbed wire fencing

Within 8 days after the completion of the barbed wire fence, it is necessary to send the measurement book along with the registration to the office of the District Superintendent of Agriculture for distribution of the grant. The full amount due for the fence should be paid to the beneficiary while distributing the grant for the barbed wire fence.

C) Third stage: film lining

Within 8 days of the completion of the film lining, the full grant (100 per cent) sanctioned for the matter should be disbursed by recording it in the measurement book.

D) Fourth stage: After filling the field with water

The remaining 20 per cent of the excavation payable grant is disbursed when the farm is flooded. Grants payable under all the above stages are credited to the collective bank account of the farmer group. M.N.R.E.G.S. It is mandatory for the beneficiaries to install filtration unit in the excavated farm pond.

Expenditure criteria for setting up of samuhik shet tale –

1) Beneficiaries will be allowed to decide the size of collective farm according to the available field conditions. The next three models are to be implemented for collective farming. For this, water storage capacity and subsidy limit will be as follows:

1.1 Half Dugout

Samuhik shet tale should cover a minimum area of ​​land, and the water level in a fully filled farm should be about five meters to minimize evaporation losses due to reduced water circulation.

10,000 cubic meters (Form-5A), 8000 cubic meters (Form-5B), 6000 cubic meters (Form-5A), 5000 cubic meters (Form-5D), 4000 cubic meters (Form-5E), 3000 cubic meters (3000 cubic meters) Form – 5E), 2000 cubic meters (Form – 5F) The depth of the field is assumed to be 1 to 3 meters considering the natural slope for excavation of the farm with storage capacity of cubic meters.

Inlets to collect runoff water for samuhik shet tale, outlets to carry excess water.

Since this type of collective farm is expected to store runoff water, it is necessary to build a filtration tank to prevent runoff from entering the farm. 2x2x2 m to create filtration tank. Make a pit of size to facilitate the flow of water through it. So that the silt in the water stays in the pit and the filtered water goes into the field. Therefore, sludge will not accumulate on the lined plastic sheet.

This type of filtration tank requires 50 to 100 mm thick gravel in the upper layer, 5 to 10 mm thick fine gravel in the middle layer and 2 to 4 mm thick sand in the lowest layer. This filtration tank is expected to cost around Rs 10,000.

Apart from this, it does not matter if the farmer has made other arrangements for filtration. However, care should be taken to ensure that the sludge from the runoff does not enter the samuhik shettale. This type of farm has an estimate of both farm and non-dam samuhik shettale

The water level should be kept at 3.10 m in a fully excavated Samuhik Shettale by storing the carried water.

Body type samuhik shet tale with storage capacity of 2500, 5000, 7500, 10,000, 12,500 and 15,000 cubic meters are required.

The construction of a body type samuhik shet tale is similar to a fully excavated samuhik shet taleHowever, it assumes a maximum depth of one meter from the ground level.

It should be noted that grants are not payable to previously excavated bodies in this campaign.

Plastic sheet lining is not expected for body type samuhik shet tale Therefore, it is not included in the budget.

The height of the embankment in body type should be 1.3 m.

While farming …

A water reservoir of suitable capacity should be constructed on the land allotted for the farm by laborers or by using the required machinery.

The area of ​​the farm should be determined according to the storage capacity.

The excavated soil in the proposed site should be leveled and compacted according to the size of the field.

The film to be used for this farm should be HDPE Reinforced Geo Membrane 500 Micron Thickness (IS: 15351: 2008).

Since the excavation, construction, filming etc. of the farm is of technical nature, the farmers should undertake the work under the guidance of an experienced expert in this field.

A solid 3×2 foot text box with complete information about the samuhik shet tale should be placed near the farm.

There should be a ladder of suitable size for descending in the field. However, this is not required in body type samuhik shet tale

Model no. Beneficiaries are required to provide separate water filling facility in the farm of 1. However, water should be diverted naturally for fully excavated farms and body type farms.

In case of overfilling in the collective farm, the excess water should be carried away automatically.

Grants for this component should not be taken under any other government scheme.

After the decision has been taken by the farmers to set up samuhik shet tale, all the members should apply to the Taluka Agriculture Officer of the concerned taluka as per the accompanying Form-1 and request them to provide subsidy for samuhik shet tale. Before applying to the Taluka Agriculture Officer, the farmers should take a trial peat at the area where the samuhik shet tale are to be set up.

 

Documents required for Collective Farm Scheme –

1. Farmer’s application

2. Excerpts 7/12, 8-A regarding land ownership

3. Mutual agreement on water and land use (Form-7) should be submitted (registered) on stamp paper of Rs. 100 / -.

Farm work should be started as soon as the approval of District Superintendent of Agriculture is received. This work should be completed within three months from the commencement.

The concerned group of farmers should inform the Taluka Agriculture Officer after the completion of the farm work in stages. Thereafter, as per the recommendation of the committee comprising the concerned Taluka Agriculture Officer and the concerned Board Agriculture Officer under the chairmanship of the concerned Sub-Divisional Agriculture Officer, the grant sanctioned up to that stage should be recommended for payment.

Leave a Comment