दसरा ( विजयादशमी ) का साजरा करतात
दसरा सण माहिती
हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट मांडून पुजा केली जाते यास घटस्थापना असे म्हणतात. घट 9 दिवसाचे असून यास नवरात्र असे म्हणतात. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात. तसेच हिंदी मध्ये यास दशहरा असेही म्हणतात.
![]() |
दसरा ( विजयादशमी ) का साजरा करतात | Happy Dussehra 2020: Vijayadashami wishes, images, quotes, WhatsApp messages, photos, status |
दसरा (विजयादशमी) ची प्रथा आणि परंपरा –
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते. तसेच महराष्ट्रामध्ये दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघन करण्याची प्रथा पुर्वीपासून असून या सिमोल्लंघनाची सुरूवात मंदीरापासून होत असून शेतकरी आपल्या शेतातील नविन पिक प्रथमत: देवाला अर्पण करण्याचीही प्रथा आहे.
लोक या दिवशी परस्परांनासोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की, मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते.
प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात.
साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्य संपन्न केली जातात. नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी,सोन्याची खरेदी केली जाते.
दसरा (विजयादशमी) साजरा करण्यामागे आख्यायीका –
दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वाढ केला. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले. पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटच्या घरी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शास्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शास्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस.
शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. दसरा म्हणजेच विजयादशमी . हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस.
दसऱ्याला (विजयादशमी) सोने (आपटयाची पाने) का वाटतात –
फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्या वेळी मानधन किंवा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे ‘कौत्स’ नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले कि, “मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ ? तुम्ही मागाल ते मी देईन. ” ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे १४ विद्यांबद्दल १४ कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या.
कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता, तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून, ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.
कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन, वरतंतू ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्यापैकी १४ कोटी सुवर्णमुद्रा परत घेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून, लोकांना लुटायला सांगितल्या. लोकानीं त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली.
राजकीय दसरा (विजयादशमी)
महाराष्ट्रामध्ये अनेक नेते हे दसरा या दिवशी आपली शक्तीप्रदर्शने दाखवत असून दसरा या दिवशी असंख्य जनसमुदाय गोळा करून आपल्या मागे असलेली ताकद दाखवतात. महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेला शिवसेना ही अनेक दिवसापासून मुंबई येथील शिवाजीपार्क वर दसरा मेळावा आयोजन करते.
ऊस तोड कामगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्हयातील वंजारी समाजाचे नामवंत नेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे संत भगवान बाबा यांचे समाधी स्थळ असलेल्या भगवानगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करत होते. त्यांच्या पश्चात दसरा मेळावा आयोजना संदर्भात झालेले गडावरील राजकारण आपण पाहीले आहे. माजी ग्रामविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी ऊस तोड कामगारांचे नेतृत्व करण्यासाठी सावरगाव घाट येथे भगवानभक्ती गडाची स्थापना करून तेंव्हापासून भगवान भक्ती गड येथे दसरा मेळावा आयोजीत केला जातो.
संस्थानी दसरे
कोल्हापूर-
महाराष्ट राज्यातील कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान हे अंबाबाई देवतेच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथील दसरा सोहळाही वैशिष्ट्यपूर्ण आहे.येथील ऐतिहासिक दसरा चौकात हा सोहळा संपन्न होतो. शाहू महाराजांचे वारस या कार्यक्रमात सहभागी होतात. संध्याकाळी भवानी मंडपातून मिरवणुकीला प्रारंभ होतो. विविध वाद्ये, तोफांचे आवाज, वाद्य पथके, सनई चौघडे, हत्ती घोडे यांची शोभायात्रा निघते. राज परिवार आणि सर्व नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेतात. शमीचे पूजन, मंत्रोच्चार करतात आणि शाहू महाराजांच्या पुतळ्याची पूजा करतात.
म्हैसूर
चामुंदेश्वरी देवीची मूर्ती सुशोभित हत्तीवर ठेवून काढली जाणारी मिरवणूक हे म्हैसूरच्या संस्थानी दस-याचे विशेष आकर्षण आहे. देश- विदेशातील पर्यटक हा उत्सव पाहण्यासाठी भारतात येतात.संगीत, नृत्य, वाद्यवादन, हत्ती, घोडे, उंट यांची मिरवणूक हे या उत्सवाचे विशेष आकर्षण आहे.
भगवानगड
भगवानगडाचे महंत श्री.नामदेवशास्त्री सानप हे वंजारी समाजाचा दसरा मेळावा करतात. या दिवशी असंख्य भावीक मोठया भक्तीभावाने गडावर येतात.
“साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी-दसरा !” या तुकाराम महाराजांच्या उक्तीत दोन सणांचा अजोड असा उल्लेख केला आहे व तो योग्यच आहे.
भारतातील विविध प्रांतांतील दसरा
उत्तर भारतातील दशहरा –
उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दशहरा उत्सव सात दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालूं असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात. कुलू शहरातला दशहरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. दशहरा दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते.
गुजरात –
सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.
छत्तीसगड –
छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्त्व दिले जाते.
महाराष्ट्र –
महाराष्ट्रात कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात.तसेच बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात.
घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे,वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.
दक्षिण भारत-
आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. लोक एकमेकाना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे.
आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्याजोडीने दस-याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीमध्ये फिरवून आणले जाते याला थेपोत्सवम असे म्हटले जाते तसेच मंदिरात आयुध पूजाही संपन्न होते.
दसरा शुभेच्छा dussehra wishes in Marathi 2020-
आपट्याची पाने, झेंडुची फुले,घेवूनी आली विजयादशमी,दसऱ्याच्या आज शुभ दिनी,सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..सना निमित्त आपणास वआपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा !
श्रीरामाचा आदर्श घेऊनरावणरूपी अहंकाराचानाश करतदसरा साजरा करूया..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव आला विजयाचा,दिवस सोनं लुटण्याचा,नवं जुनं विसरून सारे,फक्त आनंद वाटण्याचा,तोरणं बांधू दारी,घालू रांगोळी अंगणी,करू उधळण सोन्याची,जपू नाती मना मनांची..विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
पहाट झाली दिवस उजाडला,आला आला सण दसऱ्याचा आला,अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..आपणास व आपल्या परिवारासविजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !
तोरणं बांधू दारी,घालू रांगोळी अंगणी,करू उधळण सोन्याची,जपू नाती मना मनांची..विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
दसरा!या दिवशी म्हणे सोनं वाटतात..एवढा मी श्रीमंत नाही,पण नशिबानं जी सोन्यासारखीमाणसं मला मिळाली..त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..सदैव असेच रहा..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..केवळ सोन्यासारख्या लोकांना..हॅप्पी दसरा!
- happy dussehra images
- happy dasara
- dussehra images
- dussehra wishes
- happy dussehra wishes
- dasara wishes
- dasara images
- happy dasara images
- dussehra date
- vijaya dashami images
- vijaya dashmi
- dasara 2020
Happy Dussehra (Vijayadashami) 2020 Wishes Images, Messages, Photos, Status: