धनत्रयोदशी 2020 महत्व, पूजा, शुभेच्छा
दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी 2020 म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिनाचे महात्म्य, या दिवशी करायच्या कृतीमागील शास्त्र जाणून घेवू महायोजना.कॉम वर
धनत्रयोदशी 2020 म्हणजे काय (Dhantrayodashi Mhanje Kay) ?
आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी 2020 असे म्हटले जाते. धनाची पूजा करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. आजच्या दिवशी शेतकरी व कारागीर लोक आपल्या व्यवसायाशी संबंधीत अवजारांची पूजा करतात. शेतकरी नांगर, तिफन, कुळव यांसारख्या शेतीशी संबंधीत सर्व अवजारांची पूजा करतात. तर व्यापारी दिवशी पाटावर लक्ष्मीची मुर्ती ठेवून तीची पूजा करतात. हिशोबाच्या वह्या, सोने-नाणे तसेच लिखापडीसाठी आणलेल्या वह्यांचीही या दिवशी पूजा केली जाते.
काय आहे धनत्रयोदशीचं महत्व? (Dhantrayodashi che Mahatva)
1. दिवाळी आनंदाचा आणि उत्साहाचा सण. या सणात धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती, धन यांच्याबद्धल आपल्या मनात असलेले प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो.
2. व्यापारी आणि शेतकरी वर्गात हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्वत्र मिठाई आणि गोडधोड पदार्थांचे वाटप केले जाते. नोकरी, व्यवसाय यानिमीत्त परगावी असलेली कुटूंबातील मंडळी एकत्र येतात. आनंदाने दिवळी साजरी करतात.
3. शेतकऱ्यांसाठी शेतातून आलेले नवे धान्य हेच त्याचे खरे धन असते. हीच त्याची संपत्ती असते. त्यामुळे तो धान्याची पूजा करतो. त्यासाठी धने, गुळ, खोबरे व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच झेंडू, शेवंती यांच्या फूलांचा हार, फुले देवाला वाहतात. आजच्या दिवशी अंगणभर पणत्या लावल्या जातात. घरांना विद्यूत रोषनाई केली जातो. घरे, गाव, शहरे व सारा आसमंत पणत्या आणि विद्यूत रोषनाईने उजळून निघतो. व्यापाली व शेतकरी वर्गात आजचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.
4. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय (जमाखर्च) द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन व्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभरात पै-पै करून जमा केलेला असावा. या पैशाचा न्यूनतम १/६ भाग प्रभुकार्यासाठी व्यय करावा, असे शास्त्र सांगते.’
5. या दिवशी श्री विष्णूच्या अप्रकट शक्तीच्या आधारे श्री लक्ष्मीची उजवी नाडी कार्यरत होऊन त्यातून उत्पन्न होणार्या तेजतत्वात्मक लहरी वेगाने ब्रह्मांडाकडे झेप घेतात. लक्ष्मीतत्वाच्या उजव्या नाडीच्या कार्यरत अवस्थेमुळे या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडातील वायूमंडल हे सोन्यासारख्या चमचमणार्या सोनेरी कणांनी उजळून निघालेले असते. या चमचमणार्या सोनेरी कणांतील श्री लक्ष्मीचे चैतन्य जिवाला मायेतील ऐश्वर्य प्रदान करून त्याच्या साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करते; म्हणून या दिवशी धनाच्या रूपात श्री लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. श्री लक्ष्मीच्या भावपूर्ण पूजेमुळे प्रत्यक्ष धनाच्या अधिपतीचे, म्हणजेच कुबेराचे पृथ्वीच्या कक्षेत आगमन होते.
6. पूर्वी राजे वर्षाच्या शेवटी आपला खजिना सत्पात्री दान करून खाली करायचे. तेव्हा त्यांना धन्यता वाटायची. यामुळे जनता आणि राजा यांच्यातील संबंध हे कौटुंबिक स्वरूपाचे होते. राजाचा खजिना हा जनतेचा असून राजा त्याचा केवळ सांभाळ करणारा आहे. त्यामुळे जनता कर देतांना आडकाठी न करता देत असे. त्यामुळे साहजिकच परत खजिना भरत असे. ‘सत्कार्यासाठी धनाचा विनियोग झाल्यामुळे आत्मबलही वाढत असे.
धनत्रयोदशीचे वैशिष्ट्ये
1. व्यावहारिक
हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते.
2. आध्यात्मिक
या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जिवाला श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जिवाच्या भावावर टिकून राहाते. आताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्यकता आहे, तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्वाचे आहे. त्यामुळे साधना करणार्या जिवासाठी हा दिवस ‘महापर्वणी’ समजला जातो.
धनत्रयोदशी पूजन – (Dhantrayodashi Puja)
‘धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धन्वंतरि एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्या हातात ‘जळू’, तिसर्या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला. (समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरि करतो.’
1.धन्वंतरी पूजन
वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृततत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
2. यमदीपदान
प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) (टीप २) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।
अर्थ : धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.
3. लक्ष्मी पुजन
‘धनत्रयोदशीला श्री लक्ष्मीतत्व पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात येते. या दिवशी श्री लक्ष्मीची पूजा करतांना सध्या लोक पैसे (नाणी, नोटा), दागिने या स्वरूपात करतात. या कारणाने श्री लक्ष्मीची कृपा खर्या अर्थाने त्यांना प्राप्त होत नाही. केवळ स्थूल धनाचे पूजन करणारा जीव मायेच्या पाशात अडकतो आणि ‘साधना करून मोक्षमिळवणे’, हा मनुष्यजन्माचा मूळ उद्देश विसरतो. या दिवशी श्री लक्ष्मीचे ध्यान आणि शास्त्र संमत पद्धतीने पूजन करणे अपेक्षित असते.’
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा – (Dhantrayodashi chya shubhechha)
लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
पहिला दिवा लागतो दारी
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी
रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी
चला साजरी करूया दिवाळी आली रे आली
दीपावली व धनत्रयोदशी च्या शुभेच्छा!!
आज धनत्रयोदशी धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो ही दिवाळी आपणांस आणि आपल्या कुटुंबास आनंदाची आणि !!भरभराटीची जाओ
Dhantrayodashi Festival 2020 Puja, Wishes, significance
It is customary to buy new ornaments on the occasion of this festival which is associated with Diwali. The merchants also worship their treasury on this day. Dhantrayodashi is the birthday of Dhanvantari Devta, the healer of deities. Mahatmya of this day, let’s know the science behind the action to be done on this day on Mahayojana.com
What is Dhantrayodashi ?
Ashvin Vadya Triodashi is called Dhantrayodashi. This day is considered special for worshiping wealth. Today, farmers and artisans worship the tools associated with their business. Farmers worship all agricultural implements like plow, tifan, kulav. On the day of the merchants, they place an idol of Lakshmi on a plate and worship it. Accounting books, gold and coins as well as books brought for writing are also worshiped on this day.
What is the significance of Dhantrayodashi? (Dhantrayodashi che Mahatva)
1. Diwali is a festival of joy and excitement. Dhantrayodashi has a unique significance in this festival. Dhantrayodashi is celebrated with a feeling of love and gratitude for the wealth we have.
2. This day is considered very important among traders and farmers. Sweets and sweets are distributed everywhere on this day. Congregations of families in Pargavi come together for work, business, etc. Celebrate Diwali with joy.
3. For the farmer, the new grain from the field is his real treasure. This is his wealth. So he worships grain. For this, coriander, jaggery, coconut and Puranpoli are offered. Also a garland of marigolds, shewanti flowers, flowers flow to God. Today, weeds are planted all over the yard. The houses are electrically illuminated. Houses, villages, towns and the whole sky is lit up with lights and electricity. Merchants and farmers celebrate this day with great joy. Vaidyas worship Dhanvantari on this day.
4. It is customary to buy new gold on the day of Dhantrayodashi. So Dhanalakshmi smells in the house all year round. At the time of actual Lakshmi Puja, one has to pay the budget for the whole year. At that time, if the wealth left till Dhantrayodashi is spent for Prabhukarya, Dhanalakshmi stays as Lakshmi till the end as money is spent for good deeds. Money is money. This money should be sweaty, hardworking, whitewashed and accumulated throughout the year. The scripture says that at least 1/6 of this money should be spent for the work of the Lord. ‘
5. On this day, based on the invisible power of Lord Vishnu, the right pulse of Lord Lakshmi is working and the radiant waves emanating from it leap towards the universe. Due to the working state of the right pulse of Lakshmitatva, on this day, the atmosphere of the entire universe is illuminated by golden particles shining like gold. The consciousness of Shri Lakshmi in these glittering golden particles creates a nurturing environment for the instrument by providing the soul with the opulence of Maya; So on this day the spirits of Shri Lakshmi are worshiped as wealth. Due to the emotional worship of Shri Lakshmi, the lord of real wealth, i.e. Kubera, arrives in the orbit of the earth.
6. In the past, kings used to lower their treasures at the end of the year by donating Satpatri. Then they felt blessed. As a result, the relationship between the people and the king was familial. The king’s treasury belongs to the people and the king is the only caretaker. Therefore, the people used to pay taxes without any hindrance. So naturally the treasury would be replenished. ‘Self-confidence also increased as money was used for good deeds.
Features of Dhantrayodashi
1. Practical
This day is considered especially important for traders; Because Shri Lakshmidevi is worshiped for gaining wealth.
2. Spiritual
On this day, the principle of Sri Lakshmidevi is projected in the universe. Therefore, the soul can acquire the grace of Sri Lakshmidevi and Narayan. That grace remains on the soul of the soul. Nowadays seekers need strength, and it is more important to live and sustain life than practical happiness. Therefore, this day is considered as ‘Mahaparvani’ for the soul doing sadhana.
Dhantrayodashi Pooja –
‘Dhanvantari was born from the churning of the sea by gods and demons. Lord Dhanvantari with four arms was born with ‘Amrit Kalash’ in one hand, ‘Jalu’ in the other hand, ‘Conch’ in the third hand and ‘Chakra’ in the fourth hand. (Coming out of the churning of the ocean.) Lord Dhanvantari uses these four hands to cure many ailments and diseases. ‘
1. Dhanvantari Pujan
Vaidya Mandali worships Dhanvantari (Vaidya of the Gods) on this day. Finely chopped neem leaves and sugar are given to people as ‘prasad’ It makes a lot of sense. Neem is derived from nectar. Dhanvantari is the giver of nectar, it seems. If five to six neem leaves are eaten daily, there is no chance of getting sick. Neem is so important; So on this day the same is given as Dhanvantari prasad.
2. Yamadipadan
Yamaraja has the job of taking the life. Death is not and cannot be missed by anyone; But in order to prevent premature death, Dhantrayodashis Yamadharma should make a dough oil lamp (Tera Dive) (Note 2) and place it on the outside of the house facing south in the evening. The ARV lamp is never facing south, only on this day so many lamps should be facing south. Then pray with the next mantra.
3. Lakshmi Pujan
‘On Dhantrayodashi, Sri Lakshmitatva comes to earth in large numbers. At present, people worship Shri Lakshmi on this day in the form of money (coins, notes), ornaments. For this reason, they do not receive the grace of Sri Lakshmi in the true sense. Only a person who worships gross wealth gets entangled in the trap of Maya and forgets the original purpose of human birth, which is to attain liberation through sadhana. On this day, Shri Lakshmi is expected to meditate and worship in a scriptural manner. ‘- Shri. Through Nilesh Chitale
Happy Dhantrayodashi – (Dhantrayodashi chya shubhechha)
Lakshmi came to your door
Happiness, prosperity and peace in your home!
Happy Dhantrayodashi to you and your family
The first light is on the door
Sari lights up the night with lanterns and lamps
Rangoli, firecrackers and farala are fun
Let’s celebrate Diwali
Happy Diwali and Dhantrayodashi !!
May Dhantrayodashi Dhanvantari always be happy with you, may you have a healthy and healthy life, may Dhanvarshav be with you, may this Diwali be unbroken, may you and your family be happy and prosperous !!