शासनाच्या विविध महा योजना | Various grand schemes of the government

 शासनाच्या विविध महा योजना

प्रस्तावना

समाजातील निराधार, वृध्द व्यक्ती, अंध, अपंग शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परितक्त्या, देवदासी महिला, अनाथ बालके इत्यादींचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनामार्फत मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. यापैकी काही योजना स्वतंत्रपणे राज्य शासनामार्फत राबविण्यात येतात तर काही महा योजना केंद्र शासनाच्या आहेत. या सर्व योजनांची माहिती सविस्तर पणे पाहू या महायोजना.कॉम या वेबसाईटवर 

शासनाच्या विविध महा योजना | Various grand schemes of the government

काही योजना केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून संयुक्तरित्या राबविण्यात येतात.

या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा याकरीता शासन विविध माध्यमातून त्याचा प्रसार व प्रचार करीत असते. दूरदर्शन, रेडीयो, बस स्टँड तसेच विविध शासकीय कार्यालयांवर योजनांच्या माहितीचे फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामसेवक, महिला बचत गट, आशा कार्यकर्ती, आरोग्य सेवक, मुख्याध्यापक, सुशिक्षित नागरिक यांचे संघटन करुन त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. हा लेख लिहीण्यामागणचे कारण आपणांसही या योजनांची माहिती व्हावी, जेणेकरुन त्याचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचेल. असे केल्यास एकही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही.

बायोमेट्रिक Biometric

योजनांचा लाभ सध्या बँक, पोस्ट खाते या माध्यमातून दिला जात आहे. त्याकरीता आपल्या राहत्या ठिकाणापासून दूर असलेल्या बँका व पोस्टामध्ये जावे लागते. यामध्ये नागरिकांचा वेळ तर वाया जातोच शिवाय त्यांना पैसेही खर्च करावे लागतात. या अडचणींवर मात करण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक Biometric पध्दतीचा वापर करण्याचे ठरविले आहे. यामध्ये लाभार्थ्यांच्या राहत्या गावाजवळच्या ठिकाणी बँकेचे प्रतिनिधी येणार असून बायोमेट्रिक मशिन्सद्वारे लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. सध्या बीड, कोल्हापूर आणि ठाणे या जिल्हयामध्ये ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. अल्पावधीच ही योजना राज्यभर राबविण्याचा शासनाचा मानस आहे. बायोमेट्रिक Biometric पध्दतीमध्ये लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात येतात. या ठशांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची ओळख पटविणे सोपे जाते. बँकेच्या प्रतिनिधीजवळ असलेल्या बायोमेट्रिक यंत्रावर लाभार्थ्यांना त्यांच्या बोटाचे ठसे उमटविल्यानंतर यंत्राद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटविली जाते व पात्र व नोंदणीकृत लाभार्थ्यांला त्याचे अनुदान दिले जाते. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा असलेली रक्कमही त्यांना कळविली जाते.

आधार क्रमांक Aadhaar number

विशेष सहाय्य योजनेमध्ये आधार क्रमांकाचा Aadhaar number वापर करण्याचा शासनाचा विचार आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या आधार क्रमांकावर आधारित लाभ देण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हळूहळू सर्व लाभार्थ्यांना आधार क्रमांक मिळाल्यानंतर आधार क्रमांकाचा वापर करुन विशेष सहाय्य योजने अंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. विशेष सहाय्य योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती येथे थोडक्यात देण्यात येत आहे. शासनाच्या सर्व योजनांमध्ये आधार कार्ड Aadhaar Card number चा उपयोग प्रामुख्याने केला जातो.

संजय गांधी निराधार योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana

संजय गांधी निराधार योजनेमध्ये शासनाकडून 600 रुपये प्रतिमाह इतके अनुदान दिले जाते.  संजय गांधी निराधार योजनेसाठी ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 21 हजार रुपयांपर्यंत आहे. ज्याचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा अंध, अपंग, शारीरिक किंवा मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, सिकलसेलग्रस्त, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत, अत्याचारित महिला, तृतीयपंथी, अनाथ बालके, देवदासी, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाची पत्नी, 35 वर्षे व त्यावरील निराधार अविवाहीत महिला अर्ज करु शकतात. सदरील अर्ज संबधित तलाठी किंवा तहसील कार्यालयामध्ये भरुन सादर करावा.

संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Sanjay Gandhi Niradhar Yojana Document List

संजय गांधी निराधार योजनेच्या अर्जासोबत खालील कागदपत्रांची आवश्यक्ता आहे.

1. वयाचा दाखला

2.  उत्पन्नाचा दाखला

3. रहिवासी दाखला 

4. अर्जदार ज्या गटाचा असेल म्हणजे अपंगांसाठी अपंग असल्याचे प्रमाणपत्र

5. विधवा महिलांसाठी पतीच्या मृत्युचे प्रमाणपत्र आदी गटाची संबधित कागदपत्रे सादर करावी लागतील.

अर्जदारास मुले असल्यास, मुले 25 वर्षांची होईपर्यंत वा त्यांना नोकरी मिळेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत अर्जदारास लाभ मिळेल.ज्या अर्जदाराला फक्त मुली असतील अशा लाभार्थ्यांच्या बाबतीत मुलीचे वय 25 वर्षे झाले वा त्या लग्न होऊन नांदावयास गेल्या तरी सुध्दा लाभ चालू ठेवण्यात येईल.

एखाद्या कुटुंबात एका पेक्षा अधिक व्यक्तींनी अर्ज केला असेल व ते सर्व अर्ज मंजूर झाले असतील तर अशा कुटुंबात मात्र एकत्रित मासिक अर्थसहाय्यता 900 रुपये मिळतील.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना Shrawan Bal Nivrutti Yojana

ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षावरील आहे व त्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21000 रु. च्या आत आहे. अशा व्यक्तींना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना (गट अ ) अंतर्गत 600 रुपये प्रतीमाह निवृत्ती वेतन देण्यात येते.

ज्यांचे नांव दारिद्र्य रेषेखालील यादीत आहे अशा 65 व त्यावरील वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य सेवानिवृत्ती योजना गट-ब मधून 400 रुपये प्रतीमाह प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते. याचा लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन येाजनेचे 200 रुपये प्रतीमाह प्रतीलाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून 400 रुपये व केंद्र शासनाकडून 200 रुपये असे एकूण 600 रुपये प्रतीमाह प्रतीलाभार्थी निवृत्ती वेतन मिळते. मात्र वरील गट –ब योजनेतील लाभ मिळण्याकरिता अर्जदाराने एकादाच अर्ज भरवयाचा आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना Indira Gandhi  Rashtriya Vrudhapkal Nivrutti Vetan Yojana

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन  योजनेमध्ये ग्रामीण भागाकरीता दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या सर्वेक्षणानुसार व शहरी भागासाठी नगर विकास विभागाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या सर्वेक्षणानुसार फक्त दारिद्रय रेषेखालील 65 व 65 वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील. या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून 200 रुपये प्रतीमाह वेतन देण्यात येते. याचा लाभ लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य शासनाकडून 400 रुपये व केंद्र शासनाकडून 200 रुपये असे एकूण 600 रुपये प्रतीमाह प्रतीलाभार्थी निवृत्ती वेतन मिळते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना Indira Gandhi  Rashtriya Widhva Nivrutti Vetan Yojana

दारिद्रय रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नांव असलेल्या 40 ते 65 वर्षापेक्षा कमी वयोगटातील विधवा या योजनेअंतर्गत पात्र आहेत. त्यांना या योजनेमधून प्रतीमाह 200 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून प्रतीमाह 400 रुपये निवृत्तीवेतन देण्यात येते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना Indira Gandhi  Rashtriya Apang Nivrutti Vetan Yojana

दारिद्रय रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या 18 ते 65 वर्षापेक्षा कमी वयोगटातील 80 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेले तसेच एक किंवा बहू अपंगत्व असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व )अपंग या योनजेमध्ये निवृत्तीवेतनास पात्र आहेत. त्यांना या योजनेमध्ये प्रतीमाह 200 रुपये निवृत्तीवेतन देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत प्रतीमाह 400 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना Rashtriya Kutumb Labh Yojana

दारिद्रय रेषेखलील कुटुंबातील 18 ते 64 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा (पुरुष अथवा स्त्री) चा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियास एक रकमी 10 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. मृत्युच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्जासोबत दारिद्रय रेषेखालील यादीत नाव समाविष्ट असल्याचा पुरावा व मृत्युचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

आम आदमी विमा योजना Aam Aadmi Vima Yojana

ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमीहीन शेतमजूरांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो. वार्षिक विम्याचा हप्ता प्रती लाभार्थी 200 रुपये इतका असून केंद्र शासनामार्फत 100 रुपये व राज्य शासनामार्फत 100 रुपये इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येतो. लाथार्थ्याचा नैसर्गिक मृत्यु झाल्यास त्याच्या वारसाला 30 हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येते. त्याचप्रमाणे खालीलप्रमाणे घटना घडल्यास लाभार्थ्यांना वारसांना, लाभार्थ्यांस रक्कम देण्यात येते. अपघाती मृत्यु झाल्यास 75 हजार रुपये, अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास 75 हजार रुपये, अपघातामुळे दोन्ही डोळे वा दोन्ही पाय गमावल्यास 75 हजार रुपये आणि अपघातामुळे एक डोळा व एक पाय गमावल्यास 37 हजार 500 रुपये इतकी रक्कम देण्यात येते. त्याचप्रमाणे लाभार्थ्याच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना 100 रुपये प्रतीमाह शिष्यवृत्ती देण्यात येते. ज्या व्यक्तीकडे 2.5 एकर बागायती किंवा 5 एकर कोरडवाहू जमीन असेल अशा व्यक्तीला या योजनेअंतर्गत भूमीहीन समजण्यात येते.

या सर्व योजना स्थानिक पातळीवर महसूली यंत्रणेमार्फत राबविण्यात येतात. म्हणजेच या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी गावातील तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा व या योजनांचा लाभ घ्यावा.

Various grand schemes of the government

Preface

Monthly financial assistance is given by the Government of Maharashtra through various schemes to make the living conditions of the destitute, old people, blind, handicapped, physically and mentally ill, destitute widows, abandoned, Devadasi women, orphans etc. in the society bearable. Some of these schemes are implemented separately by the State Government while some of the Maha Schemes are by the Central Government. See the details of all these schemes in detail on the website Mahayojana.com

Some schemes are implemented jointly by the Central and State Governments.

In order to extend the benefits of these schemes to more and more citizens, the government is spreading and propagating them through various means. Information boards of the schemes have been put up on television, radio, bus stands as well as various government offices. Efforts are also being made to provide benefits to the beneficiaries by organizing Gramsevaks, Mahila Bachat Groups, Asha Karyakartis, Health Workers, Headmasters, Educated Citizens. The reason for writing this article is that you should also be aware of these schemes so that its benefits reach the beneficiaries. By doing so, no beneficiary will be deprived of benefits.

Biometric

The benefit of the scheme is currently being given through bank, post account. For that you have to go to banks and post offices far from your place of residence. In this, citizens’ time is wasted and they have to spend money. To overcome these problems, the government has decided to use biometric system. Representatives of the bank will be present near the village where the beneficiaries reside and the grants will be distributed to the beneficiaries through biometric machines. Currently the scheme is being implemented on a pilot basis in Beed, Kolhapur and Thane districts. It is the intention of the government to implement this scheme in the state in a short span of time. Beneficiary fingerprints are taken in biometric system. It is easy to identify the beneficiaries through these tips. After the beneficiaries stamp their fingerprints on the biometric device in the possession of the bank representative, the beneficiaries are identified by the device and the grant is given to the eligible and registered beneficiaries. They are also informed about the amount deposited in the bank account of the beneficiary.

Aadhaar number

The government intends to use the Aadhaar number in the special assistance scheme. Currently, a project based on Aadhaar number is being implemented in the municipal area. Gradually, all the beneficiaries will be given financial assistance under the special assistance scheme using the Aadhar number after getting the Aadhar number. The various schemes implemented under the Special Assistance Scheme are briefly given here. Aadhar card is mainly used in all government schemes.

Sanjay Gandhi Niradhar Yojana

In Sanjay Gandhi Niradhar Yojana, a grant of Rs. 600 per month is given by the government. For Sanjay Gandhi Niradhar Yojana with a combined annual family income of up to Rs. 21,000. Blind, disabled, physically or mentally ill person above 65 years of age, sickle cell, widow, abandoned, divorced, abused woman, third party, orphaned child, Devadasi, wife of imprisoned head of household, unmarried woman 35 years and above Can apply. The application should be submitted to the concerned Talathi or Tehsil office.

Documents required for Sanjay Gandhi Niradhar Yojana

The following documents are required along with the application for Sanjay Gandhi Niradhar Yojana.

1. Proof of age

2. Proof of income

3. Resident certificate

4. The group to which the applicant belongs is a certificate of disability for the disabled

5. For widows, the relevant documents of the group such as death certificate of the husband will have to be submitted.

If the applicant has children, the applicant will get the benefit till the children reach the age of 25 years or whichever happens earlier.

If more than one person has applied in a family and all the applications have been approved, then such family will get a combined monthly financial assistance of Rs. 900.

Shravanbal Nivrutti Yojana

A person who is between 65 and 65 years of age and whose total annual family income is Rs. Is within. Such persons are paid a pension of Rs. 600 per month under the State Government’s Shravanbal Seva State Retirement Scheme (Group A).

The State Government pays a monthly pension of Rs. 400 / – per month from Shravanbal Seva State Retirement Scheme Group-B to the elderly aged 65 and above whose name is in the list below the poverty line. Beneficiaries are given a pension of Rs. 200 per month under the Central Government’s Indira Gandhi National Old Age Pension Scheme. As a result, these beneficiaries get a total pension of Rs. 400 per month from the State Government and Rs. 200 from the Central Government. However, in order to avail the benefits of the above Group-B scheme, the applicant has to fill the application only once.

Indira Gandhi National Old Age Retirement Scheme

According to the Indira Gandhi National Old Age Retirement Scheme, below the poverty line for rural areas and for urban areas, according to the survey of families below the poverty line by the Urban Development Department, only all persons below 65 and 65 years of age will be eligible. These beneficiaries are paid a salary of Rs. 200 per month by the Central Government. Beneficiaries get a total pension of Rs. 600 per month from the State Government’s Shravanbal Seva State Government and Rs. 200 from the Central Government.

Indira Gandhi National Widow Retirement Scheme

Widows under the age of 40 to 65 who are listed in the list of families below the poverty line are eligible under this scheme. He is paid a pension of Rs. 200 per month from this scheme. These same beneficiaries are given a pension of Rs. 400 per month from the Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana of the state government.

Indira Gandhi National Disability Retirement Scheme

More than 80 per cent of the persons in the age group of 18 to 65 years with disabilities named in the list below the poverty line and one or more persons with disabilities (two or more disabilities) are eligible for retirement in this scheme. He is paid a pension of Rs. 200 per month under this scheme. These same beneficiaries are paid a pension of Rs. 400 per month under the state government’s Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana.

National Family Benefit Scheme

In case of accidental or natural death of an earning person (male or female) in the age group of 18 to 64 years below the poverty line, a lump sum of Rs. Applications must be submitted within 1 year from the date of death. Proof of inclusion of name in the BPL list and proof of death must be submitted along with the application in the prescribed form.

Aam Aadmi Vima Yojana

The scheme provides landless agricultural laborers in the age group of 18 to 59 years in rural areas. The annual premium is Rs. 200 per beneficiary and Rs. 100 is paid by the Central Government and Rs. 100 by the State Government to the Life Insurance Corporation of India. In case of natural death of Lathartha, an amount of Rs. 30,000 is given to his heirs. Similarly, in case of the following incidents, the amount is paid to the beneficiaries, heirs and beneficiaries. 75,000 in case of accidental death, Rs. 75,000 in case of permanent disability due to accident, Rs. 75,000 in case of loss of both eyes or both legs in case of accident and Rs. 37,500 in case of loss of one eye and one leg in case of accident. Similarly, two students studying in class IX to XII of the beneficiary are given a scholarship of Rs. 100 per month. A person who has 2.5 acres of irrigated land or 5 acres of dry land is considered landless under this scheme.

All these schemes are implemented at the local level through the revenue system. That is, to avail all these schemes, the applicant should contact the Talathi or Tehsildar’s office in the village and avail the benefit of these schemes.

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top