माझी कन्या भाग्यश्री | MAZI KANYA BHAGYASHREE SCHEME

माझी कन्या भाग्यश्री

महाराष्ट्र शासनाच्या माझी कन्या भाग्यश्री ही एक महायोजना असून महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण या विभागामार्फत ही महायोजना सुरू आहे. या महा योजनेविषयची माहिती पुढील प्रमाणे पाहू या

माझी कन्या भाग्यश्री या महा योजनेचा उद्देश –

महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढवीणे, लिंग निदानास आळा बसवीणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे तसेच मुलगा व मुलगी यामधील दरी नष्ट करणे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री ही योजना दि.01 एप्रिल 2016 पासून संपूण राज्यामध्ये लागू केली. व ही योजना दि.01 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजना सर्व घटकांसाठी लागू करण्यात आली.

माझी कन्या भाग्यश्री या महा योजनेच्या लाभार्थी निवडीचे निकष :-

1. एका मुलीनंतर आई किंवा वडीलाने कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास –

एका मुलीनंतर आई किंवा वडीलाने कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास  माझी कन्या भाग्यश्री या महायोनेअंतर्गत मुलीच्या नावे रूपये 50000/- (पन्नास हजार) रक्कमेची मुदत ठेव बँकेमध्ये करण्यात येईल.
(अ) रूपये 50000/- (पन्नास हजार) इतक्या रक्कमेवर 6 वर्षासाठी अनुज्ञेय होणारे फक्त व्याज हे मुलीला 6 व्या वर्षात काढता येईल.
(ब) पुन्हा मुद्दल रूपये 50000/- (पन्नास हजार) गुंतवणूक करून फक्त व्याज वयाच्या 12 व्या वर्षी काढता येईल.
(क)  पुन्हा मुदृल रुपये 50,000/-गुंतवणूक  करुन 6 वर्षांसाठी अनुज्ञेय होणारे व्याज + मुद्यल दोन्ही रक्कम वयाच्या 18 व्या वर्षी काढता येईल.
आई / वडील यांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच 50000/- (पन्नास हजार) रूपये रक्कम मुलींच्या नावे जमा करण्यात येईल.‍ अशाप्रमारे जमा केलेल्या रक्कमेवर त्यावेळी अनुज्ञेय असलेले व्याज तिला अनुज्ञेय होईल.

2.दोन मुलीनंतर आई / वडीलांनी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर – 

दोन मुलीनंतर आई किंवा वडीलाने कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास  माझी कन्या भाग्यश्री या महायोनेअंतर्गत मुलीच्या नावे रूपये 25000/- (पंचेवीस हजार) रक्कमेची मुदत ठेव बँकेमध्ये करण्यात येईल.
(अ) रूपये 25000/- (पंचेवीस हजार) इतक्या रक्कमेवर 6 वर्षासाठी अनुज्ञेय होणारे फक्त व्याज हे मुलीला 6 व्या वर्षात काढता येईल.
(ब) पुन्हा मुद्दल रूपये 25000/- (पंचेवीस हजार) गुंतवणूक करून फक्त व्याज वयाच्या 12 व्या वर्षी काढता येईल.
(क)  पुन्हा मुदृल रूपये 25000/- (पंचेवीस हजार) गुंतवणूक  करुन 6 वर्षांसाठी अनुज्ञेय होणारे व्याज + मुद्यल दोन्ही रक्कम वयाच्या 18 व्या वर्षी काढता येईल.
आई / वडील यांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच रूपये 25000/- (पंचेवीस हजार)  रक्कम मुलींच्या नावे जमा करण्यात येईल.‍ अशाप्रमारे जमा केलेल्या रक्कमेवर त्यावेळी अनुज्ञेय असलेले व्याज तिला अनुज्ञेय होईल.

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अटी व शर्ती –

1. माझी कन्या भाग्यश्री ही महा योजना बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबविण्यातय येईल. त्यासाठी बँकेसोबत आयुक्त, एकात्मीक बालविकास सेवायोजना, नवी मुंबई हे आवश्यक तो करारनामा करतील.
2. माता-पिता / आई – वडील यांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सादर करणे बंधनकारक राहील.
3.माझी कन्या भाग्यश्री या महायोजनेचा लाभ हा दि.01ऑगस्ट 2017 रोजी जन्मलेल्या व त्यानंरत जन्मलेल्या मुलींनाच अनुज्ञेय राहील.
4. माझी कन्या भाग्यश्री या महायोनेचा लाभ घेताना ज्या कुटूंबामध्ये दि.01 ऑगस्ट 2017 पुर्वी 01 मुलगी आहे व 01 ऑगस्ट 2017 नंतर  दुसऱ्या मुलीचा जन्म झालेला असेल अशा कुटूंबासाठी रूपये 25000/- लाभ अनुज्ञेय राहील.
5. पहिले आपत्य मुलगा असल्यास व दुसरे आपत्य मुलगी असल्यास किंवा पहिले आपत्य मुलगी असल्यास व दुसरे आपत्य मुलगा असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
6. कुटूंबात पहिले आपत्य मुलगी आहे. दूसरे आपत्य ही मुलगी असेल तर माझी कन्या भाग्यश्री या महायोजनेचा लाभ अनुज्ञेय असेल परंतु त्यानंतर जर तिसरे आपत्य झाल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. यापूर्वीच लाभ घेतला तर त्याची अतितात्काळ वसुली करण्यात येईल तसेच तिसरे आपत्य झाल्यामूळे पहिल्या दोन्ही आपत्यांचे लाभ बंद करण्यात येतील.
7. माझी कन्या भाग्यश्री या महायोजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
8. माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी मुलीचा अर्ज सादर करताना मुलीचे जन्माचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
9. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर जुळया मुली झाल्यास ही योजना अनुज्ञेय असेल व लाभास पात्र असेल.

  • माझी कन्या भाग्यश्री या महायोजनेच्या अधिका माहितीसाठी शासन निर्णय Download करा


_________________________________________________________________________________

Mazi Kanya Bhagyashree

My daughter Bhagyashree of Maharashtra Government is a master plan and this scheme is being implemented through the Department of Women and Child Welfare of Maharashtra Government. Let us see the following about the scheme

The purpose of this grand scheme of my daughter Bhagyashree –

The Maharashtra government implemented my daughter Bhagyashree in the entire State from 01.01.2016, with the aim of increasing the birth rate of girls, preventing gender diagnosis, promoting girls ‘education, enhancing girls’ health status and eliminating the gap between boys and girls in the state of Maharashtra. And this scheme has been implemented from 01.01 August 2017 to my daughter Bhagashree Shri Modified Plan.

The criteria for selection of beneficiaries of Mazi Kanya Bhagyashree Maha Yojana:

1. If a parent or family undergoes surgery after a girl –

In case of mother or father performing arthritis surgery after a girl, under my daughter Bhagyashree Mahayon, the amount of Rs.
(A) The only interest which can be allowed for 6 years at the amount of Rs.500 / – (fifty thousand) can be deducted from the girl in the 6th year.
(B) Again the principal can be deducted at the age of 12 only by investing Rs. 50000 / – (fifty thousand).
(C) 3) The principal will be deducted at the age of 18, with an investment of Rs. 50,000 / – and interest payable for 6 years.
The amount of Rs. 50000 / – (Fifty Thousand) will be deposited in the name of the girls only after the parents have submitted the certificate for family planning surgery.

2. After Two Daughters After Family Planning Surgery –

In case of parents or family surgery after two daughters, under my daughter Bhagyashree Mahayojana, the amount of Rs. 25000 / – (Rs. 25,000) will be fixed in the depository bank.
(A) Only interest which can be licensed for 6 years at the amount of Rs. 25000 / – (Twenty-Five Thousand) can be deducted in the 6th year.
(B) Again, only interest can be deducted at the age of 12 by investing Rs. 25000 / – in principal.
(C) 3) Re-investment of Rs.
The amount of Rs. 25000 / – (twenty-five thousand) will be deposited in the names of the girls only after the parents have submitted the certificate of family planning surgery.

My Daughter Bhagyashree Scheme Terms and Conditions –

1. Maha Kanya Bhagyashree This Maha Yojana will be implemented through Bank of Maharashtra. For this, the Commissioner with the Bank, Ekatik Child Development Services, Navi Mumbai will sign the necessary agreement.
2. The parents / parents will have to submit the certificate of eligibility surgery before availing the scheme.
3. The benefit of the scheme of my daughter Bhagyashree, will be applicable only to girls born and born on 01.01.2017.
4..Referring Rs 25000 / – to the family who has 01 daughter before 01.01.2017 and having second daughter after 01 August 2017 while taking advantage of Mahayojana my daughter Bhagyashree.
5. If the first objection is the child and the second is the objection girl or the first objection is the girl and the second is the objectionable child then the scheme will not benefit.
6. The first objection to the family is the girl. If the second objection is a girl, then the benefit of Mazi Kanya Bhagyashree scheme will be permissible, but if there is a third disaster then the benefit of the scheme will not be. If you take advantage of this already, it will be recovered immediately and due to the third objection, the benefits of the first two objections will be terminated.
7. The beneficiary of the scheme, Mazi Kanya Bhagyashree, must be a native of the state of Maharashtra.
8. When submitting the application form for my daughter Bhagyashree, the girl should have a birth certificate.
9. In case of twin delivery, if twin girls have this plan then it is permissible and eligible for benefit.

Download Gr About Mazi Kanya Bhagyashree – 

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top