गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
गोपीनाथराव जी मुंडे हे महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे सर्व समाज मान्य लोकनेते होते. तसेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र चे प्रमुख नेते असल्याने व महाराष्ट्रामध्ये सन 2014 साली भाजपा महायुतीची सत्ता अल्याने स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मर्णार्थ महाराष्ट्र शासनाने शेतकरी बांधवांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू केली.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा उद्देश :-

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची माहिती :-
महाराष्ट्र राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता हा गोपीनाथ मुंडे अपघात योजनेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत भरण्यात आला असून दोन लाख (200000) रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. अपघात होणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही 90 दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येईल. विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी 10 ते 75 या वयोगटातील सातबाराधारक असणे आवश्यक आहे.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी पात्रता :-
1.मुख्य व्यवसाय हा शेती असला पाहीजे.
2.जमीन ही स्वता: ची असली पाहीजे.
3.शेतकऱ्याचे वय हे 10 वर्षे ते 75 वर्षापर्यंत असले पाहीजे.
गोपीनाथ मुंडे अपघात योजनेसाठी लागणारे कागदपत्रे :-
1. शेतीचा 7/12
2. नमुना 8 अ
3. आधार कार्ड (उपलब्ध असल्यास)
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ केंव्हा मिळेल :-
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, हिस्त्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल आणि अन्य कोणतेही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे. जर वरील समाविष्ट कारणांपैकी एखाद्या कारणामूळे शेतकऱ्याचा अपघात झाला तर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यास लाभ मिळेल.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ केंव्हा मिळणार नाही :-
नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा विमा संरक्षणात समावेश नाही.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम :-
1.अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
2.अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी संपर्क कार्यालय :-
1.शेतकऱ्यांनी नजिकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
2.अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा.
3.त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजूरीसाठी पाठवितात.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा शासन निर्णय :-
_____________________________________________________________________
Gopinath Munde Apghat vima yojana
Gopinathrao Ji Munde was a recognized leader of all the societies of Bahujan community in Maharashtra. Also, as the Bharatiya Janata Party is the main leader of Maharashtra and since the BJP came to power in Maharashtra in 2014, the Maharashtra Government has launched Gopinath Munde accident insurance scheme for the farmers brothers in memory of the late Gopinathraoji Munde.
Purpose of Gopinath Munde Apghat vima yojana: –
In Maharashtra, 70% of the population is the main business of agriculture and due to financial strain on the families of farmers after the accident, the Maharashtra government started this Gopinath Munde accident insurance scheme. The government has now rushed to help in the case of accidents caused by accidents, scorpions, electric shock, lightning, floods, snakes, etc. In case of death or disability due to accident, Gopinath Munde Farmer is funded by the Government under the Accident Insurance Scheme. In case of accident to the farmer, the family’s income source is shut down and the problem is created. In this case, the casualty farmer or his family is funded through the scheme.
Information on Gopinath Munde Accident Insurance Scheme: –
The Insurance Week for all the seven stakeholder farmers in the state of Maharashtra has been paid by the Government of Maharashtra for the Gopinath Munde accident plan and a sum insured of Rs two lakh (200000). Accidental farmers’ insurance proposals can be submitted to the insurance company anytime for up to 90 days after the insurance period and even after the end of the insurance period. In order to get the benefit of insurance, farmers need to be a shareholder between the ages of 10 and 75
Eligibility for Gopinath Munde Accident Insurance Scheme: –
1. The main business must be agriculture.
2. The land itself must be real.
3. The age of the farmer should be from 10 years to 75 years.
Documents required for Gopinath Munde accident plan: –
1. 7/12 of farming
2. Sample 8 a
3. Aadhar card (if available)
When Will Gopinath Munde Apghat vima yojana Benefit: –
Gopinath Munde Accident Insurance Scheme Insurance, road or rail accident, poisoning in water, handling of pesticides or other causes, poisoning due to electric shock, death due to lightning strike, murder, high altitude accident, snake bite and scorpion, killing by naxalite, Injury or death due to eating or biting, riots and any other These accidents have been included. If one of the above factors causes a farmer’s accident, then the benefit under the Gopinath Munde Apghat vima yojana will benefit the farmer.
When will Gopinath Munde Apghat vima yojana not avail: –
Natural death, disability prior to insurance, suicide attempt, suicide or consciously injuring yourself, accidental violation of law for the purpose of crime, misdemeanor misdemeanor, childbirth, in-house bleeding, motor vehicle accident, war, military Jobs, murders from a nearby beneficiary Is not covered by insurance cover.
Amount of benefit received under Gopinath Munde Apghat Vima Yojana: –
1. Two lakh rupees will be compensated for accidental death or accidental loss of two eyes or two organs.
2. One lakh rupees will be compensated for loss of one eye and one limb due to accident.
Contact Office for Gopinath Munde Accident Insurance Scheme: –
1. Farmers should contact the nearest Agriculture Assistant, Agricultural Supervisor or Taluka Agricultural Officer.
2. In case of accident, the farmer or his heirs should submit a complete proposal to the Taluka Agricultural Officer.
3. Then through the office of the District Superintendent Agricultural Officer, the government’s insurance adviser conducts the primary scrutiny and sends the proposal to the insurance company for final approval.