संजय गांधी निराधार योजना
शासनाच्या वतीने अनेक योजना चालविण्यात येत आहेत– त्यात संजय गांधी निराधार योजना आहे. ही योजना प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयामार्फत चालविली जाते.
संजय गांधी निराधार योजनेचा उद्देश–
राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे.
संजय गांधी निराधार योजनेच्या पात्रतेचे निकष, अटी आणि शर्ती –
1.निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी, परित्यक्त्या या किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक
2.वय– ६५ वर्षांपेक्षा कमी
3.कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाचे स्वरूप –
1.लाभार्त्यांस दरमहा रुपये ६००/- देण्यात येतात
2.एका कुटुंबात एका पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास कुटुंबाला रुपये ९०० प्रतिमाह अनुदान देण्यात येते.
संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –
1.वयाचा दाखला
2.रहिवासी दाखला
3.उत्पन्नाचा दाखला/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.
4.अपंगत्व/ रोगग्रस्त बाबत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन)/ सरकारी हॉस्ल्च्य रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला
संपर्क
अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित तलाठी/ तहसीलदार.
___________________________________________________________________________________
Sanjay Gandhi Niradhar Yojana
Many schemes are being run on behalf of the government – including Sanjay Gandhi Niradhar Yojana. This scheme is run by the tehsil office of each taluka.
Purpose of Sanjay Gandhi Niradhar Yojana –
Homeless, elderly people in the state. Sanjay Gandhi Niradhar Anudaan Yojana has been implemented since 1980 with the basic objective of providing financial assistance to blind, disabled, physically and mentally ill persons, widows, oppressed women, women freed from prostitution and divorced women.
Eligibility Criteria, Terms and Conditions of Sanjay Gandhi Niradhar Yojana –
Must be a resident of the State of Maharashtra for at least 15 years as destitute, elderly, blind, disabled, physically and mentally ill, widows, abused women, divorced women, orphans, third parties, abandoned persons
2. Age – less than 65 years
3. Family income up to Rs. 21,000 / – per annum
Benefits of Sanjay Gandhi Niradhar Yojana –
1. Beneficiaries are given Rs.600 / – per month
2. If there is more than one beneficiary in a family, a grant of Rs. 900 per month is given to the family.
Documents required for Sanjay Gandhi Niradhar Yojana –
1. Proof of age
2. Resident certificate
3. Proof of income / attested transcript of inclusion in the list of families below the poverty line.
4. Certificate of District Surgeon (Civil Surgeon) / Medical Superintendent of Government Hospitals regarding Disability / Disease
Contacts
Relevant Talathi / Tehsildar of the area where the applicant resides.