अध्यापनात संगणकाचा वापर वैशिष्ट्ये | संगणकाची शैक्षणिक उपयुक्तता , प्रमुख शैक्षणिक साधन | संगणकाचे फायदे | Use of computer in teaching features, Educational utility of computer | Computer Major Educational Tools

 अध्यापनात संगणकाचा वापर

सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते.  मित्रांनो माणवाला चांगल्या पध्दतीने जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या प्रमाणेच शिक्षण आणि आत्ता सगळयात महत्वाचे म्हणजे संगणक शिक्षण ही माणवाची अत्यावश्यक गरज बनली आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्या व्यक्तींना लिहीता वाचता येत नव्हते अशा व्यक्तिंना निरीक्षर समजले जात होते परंतु अत्ता हा विचार बदलला असून ज्यांना संगणक चालवता येत नाही अशा व्यक्तींना निरीक्षर समजले जात आहे.   माणव जातीची निर्मीती झाल्यापासून माणसाणे आपल्या उदरनिर्वाहासाठी बऱ्याच प्रकारचे शोध लावले. माणवाने आवश्यक्तेनूसार गरजचे शोध लावून माणवाणे निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करूण माणवी जीवण नेहमी सुखकर बणविण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. शोधामुळे माणवी जीवनात एक नविन उत्क्रांती निर्माण झाली. असे म्हणतात “गरज ही शोधाची जननी आहे”.

 अध्यापनात संगणकाचा वापर वैशिष्ट्ये | संगणकाची शैक्षणिक उपयुक्तता , प्रमुख शैक्षणिक साधन | संगणकाचे फायदे | Use of computer in teaching features, Educational utility of computer | Computer Major Educational Tools

सध्याचे युग हे मित्रांनो विज्ञान युग आहे आणि या विज्ञान युगामध्ये माणवाने संगणकाच्या मदतिने सर्व विश्व आपल्या मुठीत घेतले आहे. माणवाच्या दैनंदीन आणि कार्यालयीन कामात नेहमी उपयोगी पडणारा होतकरू मित्र म्हणजे संगणक. आपण कल्पना करू शकत नाही इतके विश्वातील ज्ञान एका सेकंदात इंटरनेटवरूण आपल्याला मिळते. संगणकामूळे वेळेची बचत होते. कामे अगदी अचूक पध्दतीने होतात. कॉम्प्यूटर नावाच्या या यंत्राने आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. यांत चिन्हांवर प्रक्रिया करणारी पद्धती किंवा व्यवस्था असून त्याची रचना व व्यवस्थापन असे असते की, ज्यामुळे माहिती स्वीकारणे, साठविणे व संस्कारित करणे आणि निकाल किंवा उत्तरे तयार करणे या प्रक्रिया आधीच साठवून ठेवलेल्या पाय-या पाय-यांनी बनलेल्या सूचनाबरहुकूम आपोआप केल्या जातात. संगणकाचा रेल्वे, विमान, आरोग्य, बॅंक, उद्योगधंदे, शिक्षण, संशोधन, विमाक्षेत्र, विद्युतविभाग इत्यादी क्षेत्र / विभाग यींत विविध कार्यांसाठी उपयोग केला जातो. ते संगणकाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण क्षमतांमुळे याला शिक्षणातील अध्ययन-अध्यापन क्षेत्र तरी कसे अपवाद असणार?

संगणकाची वैशिष्ट्ये

१. वेग – संगणकाच्या कामाचा वेग अतिप्रचंड आहे.

२. स्मरणशक्ती – संगणकांची मुख्य स्मरमशक्ती मर्यादित असली तरी दुय्यम स्मरणशक्ती साधने वापरून खूप मोठ्या प्रमाणावर माहिती साठविता येते.

३. अचूकता – संगणक दिलेले काम दिलेल्या सुचनांप्रमाणे अतिशय अचूकतेने करतो.

४. अष्टपैलू उपयोगिता – ज्या कामाबाबत तर्कसंगत व क्रमवार सूचना देता येतात असे कोणतेही काम सामान्यपणे संगणक करू शकतो. या त्याच्या गुणधर्मामुळे संगणक विवध प्रकारची कामे पार पाडू शकतो उदा. वाहतुकीचे नियंत्रण, गुणपत्रिका छपाई इत्यादी.

५. संगणक हे एक तंत्र असल्याने त्याच्यामध्ये न कंटाळता व न थकता अचूकपणे काम करण्याची क्षमता आहे.

६. संगणकाच्या सर्व क्रियांमध्ये सातत्य, विश्वासार्हता दिसून येते.

७. संगणकाची विविधांगी उपयोगिता पाहता त्यावर होणारा खर्च नगण्य आहे.

८. भावनिक दृष्टीने कोणत्याही प्रसंगाचा संगणकाच्या कार्यक्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

संगणकाची शैक्षणिक उपयुक्तता

संगणकाचा वापर दैनंदिन जीवनात पदोपदी होत असलेला दिसून येतो. संगणकज्ञानामध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे संगणक शिक्षणक्षेत्रात देखील वेगवेगळ्या कार्यासाठी एक साधन म्हणून उपयुक्त साधन आहे. गरज आहे ती आज संगणकाचा वापर कल्पकतेने आणि योग्य सावधगिरी बाळगून शैक्षणिक प्रक्रियेत वापरण्याची काही उपयुक्त अप्लिकेशन सॉफ्टवेअरमुळे संगणकाचा शिक्षणक्षेत्रात ट्यूटर, साधन म्हणून वापर करता येतो.

१. शाळेमध्ये संगणक शिक्षकांना गुणपत्रिका तयार करण्यासाठी तसेच शिक्षणप्रक्रियेत मदत करतो.

२. निरनिराळ्या कार्यालयांमध्ये हा त्यांची कामे सोपी व लवकर करण्यास मदत करतो.

३. शालेय आरोग्य तपासणीसंबंधी माहिती साठवून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान मदत करू शकतो.

४. दृक-श्राव्य माध्यमांमध्ये ग्राफिक्स आणि ऍनिमेशनच्या साहाय्याने प्रभावी व आकर्षक कार्टून्स, रेखाचित्रे, थ्रीडी चित्रे, पूर्णपणे संगणकाद्वारेच निर्णाण केली जातात. या आधारे भाषा विषयासंबंधी व विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे या विषयांतील शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करता येते.

५. शिक्षणात संगणकाचा वापर गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणात होत आहे. संगणकामुळे आपल्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाले आहेत. आज संगणकाचा वापर होत नाही असे जवळपास एकही क्षेत्र नाही.

६. संगणकाच्या साहाय्याने स्वयंअध्ययन प्रक्रिया प्रभावी व सुलभ होते.

७. क्रमान्वित पाठ अध्ययन पद्धतीचा वापर संगणकाच्या साहाय्याने करणे सुलभ जाते.

८. स्वगतीने विद्यार्थ्यास कुठल्याही घटकाचे अध्ययन करणे सुलभ जाते.

९. मानव विकासाच्या अवस्थेसंबंधी चित्रे, संबंधित शास्त्रज्ञांची चित्रे, पाठ घटकांतील आवश्यक चित्रे व नकाशे यंत्रांच्या साहाय्याने स्कॅनिंग करून संगणकावर साठवून त्याचा गरजेनुसार अध्यापनात वापर करता येतात.

१०. शालेय प्रयोगशाळेत संगणकाचा प्रभावी उपयोग करून प्रात्यक्षिक कृतिद्वारे अध्ययनअनुभव देता येतो.

११. संदर्भज्ञानासाठी आणि मूल्यमापनासाठी देखील माहिती संप्रेषण तंत्राचा प्रभावी उपयोग करता येतो.

१२. संगीत, खेळ, कार्यानुभव, चित्रकला या विषयांमध्ये माहिती संप्रेषण तंत्रांच्या वापराला अधिक वाव आहे.

१३. विविध शैक्षणिक व व्यावहारिक संदर्भ आंतरजालाच्या मदतीने निळविता येतात.

संगणक प्रमुख शैक्षणिक साधन –

शिक्षण तज्ञांच्या मते सुमारे 83 टक्यांपेक्षा जास्त ज्ञान विद्यार्थी हा दृकश्राव्य (डोळयाने पाहणे व ऐकणे) साधनांच्या माध्यमातून आत्मसात करत असतो. संगणकाची उपयुक्तता आणि वैशिष्टयांमूळे संगणक शिक्षण प्रक्रियेत शैक्षणिक साधन म्हणून महत्वाची भुमीका निभावतो.  आपण ऑफलाईन व ऑनलाईन द्वारे शिकविण्यासाठी संगणकाचा महत्वाचा उपयोग होतो. पूर्वी संगणक म्हणजे केवळ डेस्कटॉप कॉम्प्युटर एवढा मर्यादीत असलेली व्याप्ती पुढे डेस्कटॉप कॉम्प्युटर बरोबरच लॅपटॉप, टॅबलेट पी.सी., स्मार्टफोन पर्यंत वाढलेली आहे. कोव्हीड-19 च्या काळामध्ये मार्च 2020 पासून बंद असलेल्या शाळा या केवळ संगणकाच्या माध्यमातून सुरू आहेत. शिक्षकाची भुमिका कोव्हीड-19 च्या काळामध्ये संगणकाने घेतलेली सर्वांनी अनुभवली आहे. 

येणाऱ्या पिढीसाठी संगणकाचा अध्ययन व अध्यापनात वापर ही काळाची गरज बनलेली दिसेल व पुस्तकांची जागा टॅबलेट पी.सी.ने घेतली तर यामध्ये काहीही नवल वाटणार नाही. मेट्रो सिटी मध्ये मिटींगसाठी वापरली जाणारे zoom, skypee, google meet हे कोव्हीड-19 च्या काळामध्ये गाव,  वस्ती व वाडयापर्यंत पोहोचल आहेत.

पॉवर पॉईंट चा अध्यापनात वापर –

विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील बरीचशी माहिती ओघ तक्त्यांच्या स्वरूपात व सचित्र मांडता येते. संगणकातील पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरचा यासाठी प्रभावीपणे वापर करता येतो. यालाठी स्लाईड्स तयार कराव्या लागतात.

अ) स्लाईड्स तयार करणे –

स्टार्ट — मेनू — प्रोग्रॅम्स या पायरीने पॉवर पॉईंट चालू करून ऍप्लिकेशन विंडो मिळतात. फाईल मेनूमधील न्यू बटण क्लिक करा. त्यानंतर ब्लॅंक प्रेझेंटेशन हा पर्याय निवडा. डायलॉग बॉक्समधील टेक्स्ट एंड चार्ट (Text and Chart) ही स्लाईड निवडून त्यामधील टेक्स्ट बॉक्समध्ये शीर्षक टाईप करून त्या खालच्या भागात माहिती भरण्यासाठी तक्ता दिसेल.

या तक्त्यात माहिती ओघतक्त्याच्या स्वरूपात लिहिता येते. वनस्पती, प्राण्यांचे वर्गीकरण, बलाचे पआकार, गतीचे प्रकार व त्यांच्या व्याख्या, अशी खूप सारी माहिती दर्शविणारी उदाहरणे इत्यादी माहिती संक्षिप्त / सारांश स्वरूपात मांडता येते.

वनस्पती पेशी, प्राणी पेशी, शरीरातील विविध संस्था यांची चित्रे व त्यांच्यासंबंधी सारांशरूपात माहिती सादर करता येते. इतकेच नव्हे तर चलचित्राचा, संगीताचा समावेश त्यात करता येते. उदा. हृदयाची स्पंदने प्रत्यक्ष हालचाली दाखविता येतात.

ब) स्लाईड शो-

तयार केलेल्या विवध स्लाईड्स क्रमवार दाखविता येतात. स्लाईड्सच्या पार्श्वभूमीचा रंग, चित्रांचा रंग, मजकुराची हालचालयुक्त मांडणी इत्यादींमुळे पॉवर पॉईंट वापरून केलेले सादरीकरण खूप आकर्षक व प्रभावी ठरते. हालचाली व रंग यामुळे अवधान टिकविले जाते व मनोरंजकताही येते.

संगणकाच्या साहाय्याने अनुदेशन –

संगणक केवळ शिक्षकालाच मदत करून थांबत नाही तर शिक्षकाचे काम स्वतः करण्याची संगणकाची तयारी असते. प्रत्यक्ष अनुदेशन प्रस्तुतीकरणाचे काम देखील संगणक करू शकतो. संगणकाच्या या कार्यतंत्रालाच Computer Assisted Instruction (CAI) असे म्हणतात. या तंत्राची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

१. अनुदेशन तंत्र हे संगणक व अध्ययन कर्ता यांच्या आंतरक्रियेवर अवलंबून असते आणि मानवी अध्ययन हे त्याचे उद्दिष्ट असते.

२. संगणक प्रत्यक्ष विद्यार्थ्याला माहिती देत असतो व विद्यार्थ्याला विवक्षित पातळीपर्यंत नेण्यासाठी संगणकामध्ये आवश्यक ती माहिती भरून ठेवलेली असते.

३. विद्यार्थ्याला स्वतः व्यक्तिगतरीत्या, स्वतःच्या वेगाने अध्ययन करता यावे अशी व्यवस्था संगणकामध्ये केलेली असते.

संगणकाच्या साहाय्याने अनुदेशनाचे प्रकार –

१. संवाद (Dialogue)

संवाद प्रकारामध्ये संगणकामध्ये विशिष्ट अशी माहिती भरलेली असते. विद्यार्थ्यांना अध्ययन करताना जी माहिती हवी असेल ती त्याने संगणकाला विचारल्यास मिळू शकते. विद्यार्थ्याने संगणकाला प्रश्न विचारायचा आणि उत्तर मिळवायचे असा प्रकार येथे अभिप्रेत असतो.

२. उजळणी व सराव (Revision and Practice) –

यामध्ये शिक्षकाने नवनवीन संकल्पनांची ओळख विद्यार्थ्यांना पारंपारिक पद्धतीने करून द्यावयाची व त्यावर आधारित उजळणी घेण्याची जबाबदारी संगणकावर सोपवायची अशी अपेक्षा असते. संगणकाची भूमिका विशिष्ट ज्ञानापुरती चाचणी घेणे. सराव घेणे एवढ्यापुरतीच मर्यादित असते.

३. विचारणा (Enquiry) –

यामध्ये अध्ययनकर्ता संगणकाला माहिती विचारतो व ती माहिती त्याला संगणकाकडून दिली जाते किंवा ती माहिती कोठे मिळेल हे सांगितले जाते.

४. समस्या निराकरण (Problem Solving) –

अध्ययनकर्त्याच्या समस्या सोडविण्यासाठी येथे संगणकाचा उपयोग एखाद्या आकडेमोड करणा-या कॅलक्युलेटर प्रमाणे केला जातो.

५. ट्यूटोरिअल (Tutorial) –

या प्रकारामध्ये अधिक गुंतागुंत असते. क्रमपाठावर आधारित असे पाठ असतात. प्रथम संगणक पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारतो. विद्यार्थ्याने उत्तर दिल्यास पुढील भाग सादर करतो, अन्यथा पूर्वज्ञानावर आधारित भागावर आशय अभायसण्यासाठी देतो व परत प्रश्न विचारतो. येथे प्रत्याभरण प्रबलन याचा वापर केला जातो. स्वयंअध्ययनासाठी उपयुक्त साधन.

६. प्रतिभास (Simulation) –

या तंत्रामध्ये एखाद्या क्रियेचा किंवा वस्तूचा अभ्यास करण्यासाठी हुबेहुब परंतु भासमय अशी क्रिया किंवा वस्तूची प्रतिकृती वापरून अध्यापन केले जाते. उदा. युरेनियमपासून किरणांचे उत्सर्जन कसे होते किंवा अणुस्फोट कसा होतो हे आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकत नाही. यासाठी संगणकामध्ये प्रतिभास प्रतिमान वापरून विद्यार्थ्यांसमोर त्या अनुदेशाने प्रस्तुतीकरण करता येते.

Use of computer in teaching

The present age is known as the age of computer. Friends, in order to live a good life, human beings need education like food, clothing, shelter and most importantly, computer education has become an essential human need. In the past, people who could not read or write were considered as observers, but now the idea has changed and people who cannot operate a computer are considered as observers. Since the creation of the human race, humans have made many inventions for their livelihood. Man has always tried to make human life pleasant by trying to overcome the human nature by finding the need as per the need. Discovery led to a new evolution in human life. It is said that “need is the mother of invention”.

The present age is the age of science, friends, and in this age of science, man has taken over the whole world with the help of computer. The computer is a budding friend that is always useful in human daily and office work. You get as much knowledge of the universe as you can imagine in a second. Computing saves time. The work is done in a very precise manner. This device called computer has made an overall impact on today’s social life. A computer is an electronic device. It consists of a method or system for processing symbols, which is designed and managed so that the processes of accepting, storing and refining information, and generating results or answers are automatically guided by the instructions that are already stored. Computers are used for various purposes in Railways, Aircraft, Health, Banking, Business, Education, Research, Insurance, Electricity etc. How can it be an exception in the field of teaching and learning in education due to some special capabilities of computer?

Computer features

1. Speed ​​- The speed of computer work is enormous.

2. Memory – Although the main memory of computers is limited, a large amount of information can be stored using secondary memory devices.

3. Accuracy – The computer performs the given task very accurately as instructed.

4. Versatile utility – A computer can normally perform any task for which logical and sequential instructions can be given. Due to its properties, a computer can perform a variety of tasks e.g. Traffic control, mark sheet printing etc.

5. Since computer is a technique, it has the ability to work accurately without getting bored or tired.

6. Consistency, reliability is evident in all computer operations.

7. Considering the various uses of computers, the cost is negligible.

8. Emotionally no occasion has any adverse effect on the performance of the computer.

Educational utility of computer

The use of computers seems to be on the rise in daily life. Due to the tremendous growth in computer science, computer education is also a useful tool for various tasks. What is needed today is to use the computer in the educational process with ingenuity and due diligence, some useful application software can be used as a tutor, tool in the field of education.

1. The computer in the school helps the teachers to prepare the marks as well as in the teaching process.

2. This helps to make their work easier and faster in different offices.

3. Information communication technology can help to store and track school health screening information.

4. In audio-visual media, effective and attractive cartoons, drawings, 3D pictures, with the help of graphics and animation, are decided entirely by computer. On this basis, educational programs related to language subjects and science, mathematics, social sciences can be created.

5. The use of computers in education has been on the rise in the last few decades. Computers have revolutionized our lives. There is almost no area where computers are not used today.

6. Computer-assisted self-study process is effective and easy.

7. The computerized learning method is easy to use.

8. Swagati makes it easier for the student to study any component.

9. Pictures on the stage of human development, pictures of the concerned scientists, necessary pictures in the text elements and maps can be scanned with the help of machines and stored on the computer and used in teaching as per the need.

10. Learning experience can be imparted through demonstrations using computers effectively in the school laboratory.

11. Information communication techniques can also be used effectively for reference and evaluation.

12. There is more scope for the use of information communication techniques in music, sports, work experience, painting.

13. Various educational and practical references can be found with the help of internet.

Computer Major Educational Tools –

According to education experts, more than 83 per cent of the knowledge is acquired by the student through audio-visual aids. Due to the usefulness and features of computer, computer plays an important role as an educational tool in the learning process. Computers are an important tool for teaching both offline and online. Computers used to be limited to desktop computers but now they have expanded to desktop computers as well as laptops, tablet PCs and smartphones. The schools, which have been closed since March 2020 during the Covid-19 era, are open only through computers. The role of the teacher has been experienced by everyone in the computer era of Covid-19.

For generations to come, the use of computers in teaching and learning has become a necessity of the times and it will not be a surprise if books are replaced by tablet PCs. The zoom, skypee, google meet used for meetings in Metro City are reaching villages, hamlets and farms in the era of Kovid-19.

Use of PowerPoint in Teaching –

A lot of information on science and technology can be presented in the form of wrapping tables and illustrations. Computer PowerPoint software can be used effectively for this. This requires the creation of slides.

A) Creating slides –

Start — Menu — Programs This step turns on PowerPoint and gets the application window. Click the New button in the File menu. Then select the Blank Presentation option. Select the Text and Chart slide in the dialog box, type the title in the text box and you will see a table to fill in the information at the bottom.

The information in this table can be written in the form of a flow table. Information on plant, animal classification, force type, type of motion and their interpretation, examples showing a lot of information etc. can be presented in a concise / summary form.

Pictures of plant cells, animal cells, various organs of the body and their summary information can be presented. Not only this, with the help of movies you can do music. E.g. The heartbeat can show the actual movement.

B) Slideshow-

The various slides created can be displayed in order. PowerPoint presentations are very attractive and effective due to the background color of the slides, the color of the pictures, the dynamic layout of the text, etc. The movement and color keep the attention and make it interesting.

Computer Instruction –

The computer does not stop at helping the teacher, but the computer is ready to do the work itself. Computers can also do the work of direct instruction presentation. This function of the computer is called Computer Assisted Instruction (CAI). The salient features of this technique are as follows –

1. Instructional techniques depend on the interaction between the computer and the learner, and human learning is the goal.

2. The computer provides information to the actual student and the computer stores the information required to take the student to a specific level.

3. The computer is arranged so that the student can study individually, at his own pace.

Types of computer aided instruction –

1. Dialogue

The type of communication is filled with specific information in the computer. Students can get the information they need while studying by asking the computer. What is meant here is a way for the student to ask the computer questions and get answers.

2. Revision and Practice –

It is expected that the teacher will introduce the new concepts to the students in the traditional way and entrust the responsibility of reviewing based on them to the computer. The role of computer is to test for specific knowledge. Practice is limited to this.

3. Inquiry –

In this the learner asks the computer for information and the information is given to him by the computer or he is told where to get that information.

4. Problem Solving –

Here the computer is used as a calculator to solve the problems of the learner.

5. Tutorial –

This type has more complications. There are lessons based on sequence. First the computer asks questions based on foreknowledge. If the student answers, he presents the next part, otherwise he gives the meaning to the part based on foreknowledge and asks the question again. Here reinforcement reinforcement is used. A useful tool for self-study.

6. Simulation –

In this technique, to study an action or an object, teaching is done using a replica of an exact action or object. E.g. We cannot show students how radiation is emitted from uranium or how a nuclear explosion occurs. For this, the instruction can be presented to the students using the talent paradigm in the computer.

2 thoughts on “अध्यापनात संगणकाचा वापर वैशिष्ट्ये | संगणकाची शैक्षणिक उपयुक्तता , प्रमुख शैक्षणिक साधन | संगणकाचे फायदे | Use of computer in teaching features, Educational utility of computer | Computer Major Educational Tools”

Leave a Comment