मराठीसाठी युनिकोडचा वापर , गरज | युनिकोड फॉन्ट ची निर्मीती, फायदे, आवश्यकता | Use of Unicode for Marathi | Advantages of using Unicode fonts | Benefits of using Unicode

मराठीसाठी युनिकोडचा वापर

छपाई क्षेत्रातही टंकलेखन यंत्राऎवजी संगणकाचा वापर  –

भारतात विविध भाषा बोलल्या जातात या भाषा लिहिण्याच्या लिप्याही वेगवेगळ्या आहेत. भाषांवर आधारित राज्यांची निर्मिती झाल्याने आणि शासकीय पातळीवर त्या त्या राज्यातील भारतीय भाषेत व्यवहार सुरू झाल्याने स्थानिक जनतेस सर्व माहिती आपल्या मातृभाषेतून मिळणे शक्य झाले. मात्र अखिल भारतीय स्तरावर एक भाषा व एक लिपी नसल्याने माहितीच्या आदानप्रदानात अनेक अडथळे निर्माण झाले . माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास झाल्याने छपाई क्षेत्रातही टंकलेखन यंत्राऎवजी संगणकाचा वापर सुरू झाला.

मराठीसाठी युनिकोडचा वापर , गरज | युनिकोड फॉन्ट ची निर्मीती, फायदे, आवश्यकता | Use of Unicode for Marathi | Advantages of using Unicode fonts | Benefits of using Unicode
मराठीसाठी युनिकोडचा वापर , गरज | युनिकोड फॉन्ट ची निर्मीती, फायदे, आवश्यकता | Use of Unicode for Marathi | Advantages of using Unicode fonts | Benefits of using Unicode

अनेक संशोधक व्यक्ती आणि संस्थांनी भारतीय भाषांतील सुबक आणि सुंदर छ्पाईसाठी विविध संगणकीय लिपीसंच ( फॉंट) विकसित केले. जलद गतीने टंक लेखन करता यावे यासाठी विविध प्रकारचे कळफलक यासाठी वापरण्यात आले. मराठी, हिंदी आणि संस्कृत यासाठी एकच देवनागरी लिपीसंच वापरण्यात येऊ लागला. मराठीपुरते बोलायचे तर मोड्युलर इन्फोटेकचे श्रीलिपी, व अंकुर श्रेणीतील फॉंट, सी डॅक चे योगेश, सुरेख हे फॉंट, कृतीदेव, शिवाजी, नटराज, चाणक्य, बोली, मिलेनियम वरूण यासारखे अनेक प्रकारचे फॉंट वापरून संगणकावर मराठी लिहिले जाते.

मात्र त्यातील कळफलकाच्या मांडणीत विविधता असल्याने टंकलेखनात तसेच एका लिपीसंचातील मजकूर दुसर्‍या लिपीसंचात बदलताना अडचणी येऊ लागल्या. मग असे बदल करून देणार्‍या संगणक प्रणाली विकसित करण्यात आल्या. संगणकावर मराठी वापरताना वा मराठीत संगणक प्रणाली विकसित करताना येणारी दुसरी अडचण म्हणजे शब्दांची वर्णानुक्रमे माडणी. संगणकावर ए, बी, सी अशा इंग्रजी वर्णमालेनुसार वर्गीकरण करण्याची सोय उपलब्ध होती मात्र मराठीतील अ, आ, इ व क, ख, ग या देवनागरी वर्णमालेप्रमाणे वर्गीकरणासाठी वेगळी संगणक प्रणाली विकसित करणे आवश्यक होते. भारत सरकारने यासाठी इंग्रजी आस्की ऎवजी भारतीय भाषांसाठी इस्की मानक तयार केले सी डॅकने आपल्या फॉंट साठी ही पद्धत वापरली.

युनिकोड फॉन्टची गरज –

मराठीचा वापर करताना संगणकावर मराठी फॉंट स्थापित करावा लागतो. इंटरनेटवर मराठी अक्षरे नीट दिसायची असतील तर पाहणार्‍याच्या संगणकावर असा फॉंट अस्णे जरूर असते. त्यामुळे मराठी भाषेतून संकेत स्थळ ( वेबसाईट) असेल तर त्या संकेतस्थळावर वापरलेला फॉंट डाऊनलोडसाठी ठेवावा लागे. तो आपल्या संगणकावर स्थापित केल्याशिवाय संकेतस्थळावरील माहिती वाचता येत नसे. साहजिकच या संकेतस्थळाचा वापर फार मर्यादित होता. फॉंट डाऊनलोड करावा लागू नये व संकेतस्थळावरूनच तो पाहणार्‍याच्या दर्शक पडद्यावर कार्यान्वित व्हावा असे डायनॅमिक फॉंट्चे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले.

फाँट डाऊनलोड न करता मराठी अक्षरे आपोआप इंटरनेटवर दिसू शकतील अशी ती व्यवस्था होती. यासाठी मायक्रोसॉफ्ट ने फॉंट चे इओटी मध्ये रूपांतर करण्यासाठी वेफ्ट प्रणाली विकसित केली. मात्र इंटरनेट एक्स्प्लोअरर शिवाय नेटस्केपसारख्या इतर ब्राऊजरचा ( दर्शक प्रणालींचा) वापर करणार्‍यांसाठी याचा उपयोग होईना. त्यांच्यासाठी बिटस्ट्रीमने फॉंटचे पी. एफ. आर तंत्रज्ञान विकसित केले. मात्र या पद्ध्तींच्या वापरासाठी लिपीसंच निर्माण करणार्‍या संस्थांकडून ते विकत घेणे आवशयक झाले. या डायनॅमिक फॉट चा वापर करून अनेक मराठी संकेतस्थळांची निर्मिती झाली. विशिष्ट लिपीच्या कळफलकाची सवय झाल्याखेरीज सर्व सामान्य लोकांसाठी संगणकावर मराठीचा वापर करणे अशक्य होते.

इंटरनेटवरील ई मेलच्या संपर्क सुविधेचा लाभ घेऊन लोक उच्चाराप्रमाणे मराठी भाषेतील मजकूर इंग्रजीमध्ये लिहून पाठवू लागले. वैयक्तिक संपर्कासाठी हे पुरेसे असले तरी त्यात सर्व उच्चार व अर्थातील छटा नीट दर्शवता येत नसत. यात प्रमाणीकरण करण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक श्री. म. ना. गोगटे यांनी मराठी लेखनासाठी रोमन लिपीचा वापर करण्यासाठी शास्त्रशुद्ध नियम तयार केले. मुंबईच्या श्री शुभानन गांगल यांनी ध्वनी व उच्चारावर आधारित व नेहमीचा कळफलक वापरून गांगल फॉंट विकसित केला व मोफत सर्वांसाठी खुला केला. इंटरनेट व संगणकाचा वापर करताना चीन, जपान, रशिया यासारख्या वेगळ्या लिपींचा वापर करणाऱ्यांना इंग्रजी भाषेचा आधार घ्यावा लागे.

युनिकोड फॉन्ट ची निर्मीती –

पूर्वीची ८ अंकांवर अक्षर चिन्ह ठर्विण्याची आस्की पद्धत इंग्रजी भाषेसाठी पुरेशी होती. मात्र जगातील सर्व भाषांतील अक्षरचिन्हे दर्शविण्यासाठी ती योग्य नव्हती. ही अडचण दूर करण्यासाठी ३२ अंकावर आधारित अशा युनिकोड ( एकमेव चिन्हप्रणाली ) लिपिसंचाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे त्यास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या मोठ्या संस्थांनीही आज ‘ युनिकोड ‘ चे तंत्र स्वीकारले. (www.bhashaindia.com) या मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळावर विंडोजसाठी युनिकोड मराठी कसे वापरायचे याची माहिती दिली अहे. श्री. ओंकार जोशी यांनी कोण्त्याही ब्राऊजरमध्ये वापरता येईल असे गमभन नावाची संगणक प्रणाली विकसित केली असून ती (http://www.var-x.com/gamabhana) या संकेतस्थळावर सर्वांसाठी मोफत ठेवली आहे. भारत सरकारच्या ‘ सीडॅक ‘ या संस्थेने ‘ युनिकोड ‘ आधारित मोफत फाँट्स आज सर्वसामान्यांसाठी इंटरनेटवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध केले आहेत . ‘ 

युनिकोड फॉन्ट वापरण्याचे  चे फायदे –

युनिकोडचा आणखी एक महत्वाचा पायदा म्हणजे लिप्यंतर किंवा एका लिपीतील मजकूर दुसर्‍यालिपीत वाचणे. उदा. युनिकोड गुजराती मजकूर आपण देवनागरीत सहजगत्या वाचू शकतो. ज्यांना गुजराती समजते पण लिपी वाचता येत नाही, त्यांना आजचा गुजरात समाचार / गुजराती ब्लॉग देवनागरीत वाचता येईल. तसेच मराठी लेख गुजराती लिपीत वाचता येतील, भाषेत नाही. म्हणजे या लेखाचे गुजरातीत भाषांतर होत नसून लिप्यंतर होऊ शकते. तंत्रज्ञान प्रगत होत आहे. पुढे मागे भाषांतर देखील संगणकच करून देईल. ब्राऊजरच्या नव्या आवृत्यांमध्ये युनिकॊडच्या सुविधेचा समावेश केला आहे. गुगल, याहू यासारख्या शोधयंत्रांनी युनिकोडचा स्वीकार केल्याने मराठी संकेतस्थळावरील माहितीचा शोध अशा शोधयंत्रावर घेणे शक्य झाले आहे .

युनिकोडचा वापर केल्यास होणारे फायदे –

जगातील सर्व भाषांसाठी एकच अक्षरसंच वापरणाऱ्या युनिकोड तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भाषा वा लिपी यांच्या विविधतेमुळे येणार्‍या अडचणी दूर होतील. हे तंत्र वापरून व त्या तंत्रावर आधारलेले टाइप ( फाँट ) आपल्या संकेतस्थळावर वापरून आज ‘ महाराष्ट्र टाइम्स ‘ सह अनेक वृत्तपत्रांच्या संकेतस्थळे तयार झाली आहेत. नई दुनिया, रेडिफ मेल, जीमेल या संपर्क संकेतस्थळांनी तसेच आर्कुट, याहू, ब्लॉगस्पॉट या चर्चा व्यासपीठानी मराठीसह अन्य भाषांचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. जगभर पसरलेले हजारो मराठी तरूण हे फाँट्स वापरून आज ‘ ऑर्कुट ‘ सारख्या संकेतस्थळावर मराठीतून गप्पागोष्टी करीत आहेत . नव्या पिढीतील शेकडो मराठीप्रेमी व्यक्तींनी ‘ युनिकोड ‘ वर आधारलेल्या मराठी ब्लॉग्जवर विविध विषयांवर मराठी लेखन केले आहे.

युनिकोडची फॉन्ट ची आवश्यकता –

सद्यस्थितीस उपलब्ध असणारी अपार मराठी साहित्य संपदा युनिकोड तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेटवर प्रसिद्ध करण्याचे ठरविले तर जगाच्या ज्ञानकोशात मोलाची भर पडेल. महाराष्ट्र शासनाने सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून यासाठी रोजगार हमीसारखी योजना काढली तर सध्या बेरोजगार असणार्‍या सुशिक्षित मराठी युवकांना काम मिळेल. शिक्षणक्षेत्रास याचा फार उपयोग होईल.याशिवाय सर्व विषयांवरील ज्ञान मराठीतून इंटरनेटद्वारे उपलब्ध झाले तर महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती होण्यास वेळ लागणार नाही.

Use of Unicode for Marathi

Use of computer instead of typewriter in printing field –

Different languages ​​are spoken in India and the scripts for writing these languages ​​are also different. With the formation of language based states and the introduction of Indian language in those states at the governmental level, it became possible for the local people to get all the information in their mother tongue. However, the lack of a single language and script at the all-India level created many barriers to the exchange of information. With the development of information technology, the use of computers instead of typing machines started in the field of printing as well.

Many research individuals and organizations have developed various computer fonts for beautiful and beautiful printing in Indian languages. A variety of keyboards were used to enable faster typing. A single Devanagari script was used for Marathi, Hindi and Sanskrit. Speaking in Marathi, Marathi is written on a computer using a variety of fonts like Modular Infotech’s Srilipi and Ankur category fonts, C-DAC’s Yogesh, Surekh He font, Kritidev, Shivaji, Nataraja, Chanakya, Boli, Millennium Varun.

However, due to the diversity in the layout of the keyboard, there were difficulties in typing as well as changing the text from one script to another. Then computer systems were developed to make such changes. Another problem that arises when using Marathi on a computer or developing a computer system in Marathi is the alphabetical arrangement of words. There was a facility available on the computer to classify according to the English alphabet such as A, B, C but a separate computer system had to be developed for classification like Devanagari alphabet like A, A, E and C, B, C in Marathi. The Government of India developed an ISK standard for Indian languages ​​instead of English ASCII. DAC used this method for its fonts.

Unicode font required –

When using Marathi, Marathi fonts have to be installed on the computer. If you want to see Marathi characters on the internet, then you must have such a font on the viewer’s computer. Therefore, if there is a website in Marathi language, the font used on that website has to be kept for download. The information on the website could not be read unless it was installed on your computer. Of course, the use of this website was very limited. The technology of dynamic fonts was developed so that the font would not have to be downloaded and would be displayed on the viewer’s screen from the website itself.

It was a system where Marathi characters could automatically appear on the internet without downloading the font. For this, Microsoft developed the WAFT system to convert fonts to EOT. However, it is not useful for users of browsers other than Internet Explorer, such as Netscape. For them, Bitstream has created a p. F. R developed technology. However, for the use of these methods, it became necessary to purchase them from the organizations that create the script. Many Marathi websites were created using this dynamic factor. It was impossible for all the common people to use Marathi on a computer unless they got used to the keyboard of a specific script.

Taking advantage of the e-mail communication facility on the Internet, people started writing and sending texts in Marathi to English. While this was sufficient for personal contact, it did not accurately reflect all the shades of pronunciation and meaning. The founder of Marathi Vigyan Parishad, Shri. M. No. Gogte developed scientific rules for the use of Roman script for Marathi writing. Mr. Shubhanan Gangal from Mumbai developed the Gangal font based on sound and pronunciation and using the usual keyboard and opened it to everyone for free. When using the Internet and computers, those who use different scripts such as China, Japan, and Russia had to rely on English.

Creating Unicode Fonts –

The ASCII method of determining the alphabet on the previous 8 digits was sufficient for the English language. But it was not suitable for showing the alphabet in all the languages ​​of the world. To overcome this problem, 32-digit Unicode scripts were developed. So it got international recognition. Even large organizations like Microsoft and Google have adopted Unicode technology today. (www.bhashaindia.com) This Microsoft website provides information on how to use Unicode Marathi for Windows. Mr. Omkar Joshi has developed a computer system called Gambhan that can be used in any browser and is available for free on the website (http://www.var-x.com/gamabhana). Free fonts based on Unicode are now available for download on the Internet by the Government of India’s CEDAC. ‘

Advantages of using Unicode fonts –

Another important step of Unicode is to transliterate or read text from one script to another. E.g. You can easily read Unicode Gujarati text in Devanagari. Those who understand Gujarati but cannot read the script can read today’s Gujarat Samachar / Gujarati blog in Devanagari. Also Marathi articles can be read in Gujarati script, not in language. This means that this article is not being translated into Gujarati but can be transcribed. Technology is advancing. The computer will also translate back and forth. Newer versions of the browser include the Unicode feature. With the adoption of Unicode by search engines like Google and Yahoo, it has become possible to search for information on Marathi websites on such search engines.

Benefits of using Unicode –

Using Unicode technology, which uses the same alphabet for all languages ​​of the world, will eliminate the problems caused by the diversity of languages ​​or scripts. Many newspaper websites including ‘Maharashtra Times’ have been created today using this technique and the type (font) based on that technique on our website. Contact websites like Nai Duniya, Rediff Mail, Gmail as well as Orkut, Yahoo, Blogspot have provided the facility to use Marathi and other languages. Thousands of Marathi youth from all over the world are using these fonts to chat in Marathi on websites like ‘orkut’. Hundreds of new generation Marathi lovers have written in Marathi on various topics on Marathi blogs based on ‘Unicode’.

Unicode font required –

If we decide to publish the vast amount of Marathi literature currently available on the Internet using Unicode technology, it will add value to the world’s encyclopedia. If the Government of Maharashtra through Sarva Shiksha Abhiyan comes up with a scheme like employment guarantee for this, the educated Marathi youth who are currently unemployed will get jobs. This will be very useful for the education sector. Apart from this, if knowledge on all subjects is made available through Marathi through internet, it will not take long for Maharashtra to make overall progress.

Leave a Comment