युनिकोड म्हणजे काय? | युनिकोड फाँट | युनीकोड फाँट चे फायदे | What is Unicode? | Unicode font | Advantages of Unicode font

 युनिकोड म्हणजे काय? | युनिकोड फाँट | युनीकोड फाँट चे फायदे

युनीकोड फाँट बद्दल माहिती – 

युनिकोड हे १६ बिट वैश्विक कॅरेक्टर एनकोडिंग मानक आहे.याचा वापर प्रामुख्याने बहुभाषिक सॉफ्टवेअरचा विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेकडून होतो.युनिकोड मानकामध्ये जगातील सर्व लिखित भाषांची सर्व कॅरेक्टर्स एनकोड करण्याची क्षमता आहे.युनिकोड मानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला विशिष्ट सांख्यिक मूल्य आणि नाव दिले जाते.युनिकोड मानक व आयएसओ १०६४६ मानकाची एक विस्तारित यंत्रणा आहे जिला यूटीएफ-१६ म्हणतात ज्यामध्ये जवळपास दहा लाख कॅरेक्टर्सचे एनकोडिंग करता येते.

 युनिकोड म्हणजे काय? | युनिकोड फाँट | युनीकोड फाँट चे फायदे | What is Unicode? | Unicode font | Advantages of Unicode font

इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज(ISCII)म्हणजे काय? –

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज(ISCII) हे मानक, सर्व संगणकांमध्ये आणि संवाद माध्यमांमध्ये वापरण्यासाठी तयार केले आहे.यामध्ये ७ किंवा ८ बिट कॅरेक्टरच्या वापराला परवागनगी आहे.८ बिट वातावरणात, खालील १२८ कॅरेक्टर्स माहितीच्या देवाणघेवाणीसाठी निश्चित केलेल्या आयएस १०३१५:१९८२(आयएसओ ६४६ आयआरव्ही) ७ बिट कोडेड कॅरेक्टर संचाप्रमाणे, ज्यांना एएससीआयआय(ASCII)कॅरेक्टर संच म्हणतात त्यामध्ये निश्चित केल्याप्रमाणे आहेत. वरील १२८ कॅरेक्टर्स प्राचीन ब्राह्मी लिपीवर आधारित सर्व भारतीय लिपींसाठी वापरली जातात. ७-बिट वातावरणात कंट्रोल कोड एसआय,आयएससीआयआय(ASCII)कोड सेट मागवण्यासाठी वापरता येतो आणि कंट्रोल कोड एसओ एएससीआयआय(ASCII)कोड संच पुन्हा निवडण्यासाठी वापरता येतात.

भारतामध्ये २२ अधिकृत भाषा आहेत. पर्शियन-अरेबिक लिपींशिवाय भारतीय भाषांसाठी वापरल्या जाणाऱ्या इतर सर्व १० लिपी प्राचीन ब्राह्मी लिपीतून निर्माण झाल्या आहेत आणि व त्यांच्या उच्चारांची रचना समान आहे, त्यामुळे कॅरेक्टर्सचा सामायिक संच तयार करणे शक्य झाले आहे. विविध भारतीय लिपी व डिस्प्लेची (प्रदर्शनाची) वैशिष्ट्ये वापरता यावीत यासाठी वैशिष्ट्यांचे एक यंत्रणा देण्यात आली आहे. विस्तार यंत्रणेमुळे आयएससीआयआय (ISCII)कोडसोबत अधिक कॅरेक्टर्स वापरता येतात. आयएससीआयआय(ISCII) कोड तक्ता हा ब्राह्मी आधारित लिपींसाठी आवश्यक असलेल्या सर्व कॅरेक्टर्सचा सुपर सेट आहे. सोयीसाठी अधिकृत लिपी देवनागरीच्या मुळाक्षरांचा मानकामध्ये वापर करण्यात आला आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने दिलेला आयएस१३१९:१९९१ हा मानकांसाठीचा क्रमांक माहितीच्या देवाणघेवाणीसाठीचे सर्वात अलिकडचे भारतीय मानक आहे याचा वापर भारतीय भाषांमध्ये आयटी उत्पादनांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर होतो.

युनिकोड आणि आयएससीआयआय कोडमध्ये कोणता मूलभूत फरक काय आहे? –

युनिकोडमध्ये १६ बिट एनकोडिंगचा वापर केला जातो जे ६५००० पेक्षा अधिक कॅरेक्टर्ससाठी (६५५३६) कोड पॉईंट देते. युनिकोड मानक प्रत्येक कॅरेक्टरला विशिष्ट सांख्यिक मूल्य आणि नाव देते. युनिकोड मानक जगभरातील सर्व लिखित भाषांसाठी वापरली जाणारी कॅरेक्टर्स एनकोड करण्याची क्षमता देते. आयएससीआयआय ८ बिट कोड वापरते जो ७ बिट एएससीआयआय कोडचा विस्तार आहे, ज्यामध्ये १० भारतीय लिपींसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत अक्षरांचा समावेश असतो. भारतामध्ये २२ अधिकृत भाषा आहेत. पर्शियन-अरेबिक लिपींशिवाय भारतीय भाषांसाठी वापरल्या जाणा-या इतर १० लिपी प्राचीन ब्राह्मी लिपीतून तयार झालेल्या आहेत आणि त्यांच्या उच्चार रचना समान आहे, ज्यामुळे सामायिक कॅरेक्टर संच बनविणे शक्य झाले. आयएससीआयआय कोड तक्ता हा ब्राह्मीवर आधारित भारतीय लिपींसाठी आवश्यक सर्व कॅरेक्टर्सचा सुपर सेट आहे. सोयीसाठी देवनागरी या अधिकृत लिपीची मुळाक्षरे मानकामध्ये वापरण्यात आली आहेत.

इनस्क्रिप्ट कीबोर्ड लेआउट म्हणजे काय? –

इनस्क्रिप्ट (इंडियन स्क्रिप्ट) ही टच टायपिंग कीबोर्ड लेआउट प्रणाली असून, संगणकावर इंडिक मजकूर टाइप करण्यासाठी वापरली जाते. भारत सरकारने या कीबोर्डचे इंडिक संगणनासाठी प्रमाणीकरण केले आहे. इनस्क्रिप्टचा सर्व इंडिक लिपींसाठी समान लेआउट आहे. भारतीय भाषांमध्ये आणि सर्व सहा भारतीय लिपींमध्ये डाटा एंट्री करण्यासाठी इनस्क्रिप्ट (इंडियन स्क्रिप्ट) लेआउट हा डिफॉल्ट पर्याय आहे. हा लेआउट प्रमाणभूत १०१ कीबोर्ड वापरतो. हा ओव्हरले कुठल्याही सध्याच्या इंग्रजी कीबोर्डला साजेसा आहे. कॅरेक्टर्सचे मॅपिंग अशा प्रकारे केले जाते की ते सर्व भारतीय भाषांसाठी (डावीकडून किंवा उजवीकडून लिहील्या जाणाऱ्या) समान असते. याचे कारण म्हणजे भारतीय भाषांसाठीच्या मूलभूत कॅरेक्टर्सचा संच समान आहे. इनस्क्रिप्ट कीबोर्ड विंडोज २०००,XP,VISTA,LINUX,MAC यासह नव्या इनबिल्ट ऑपरेटिंग सिस्टिमसह येतो.

ISM V6 च्या साह्याने COREL DRAW आणि ADOBE PRODUCTS मध्ये युनिकोड टंकलेखन करता येते ? –

भारतीय भाषेसाठी Corel आणि Adobe मध्ये युनिकोड अजून साहाय्यभूत नाही.हे उत्पादन युनिकोडशी साहाय्यभूत झाल्यानंतर ISM V6 मध्ये युनिकोड टंकलेखन करता येईल. सध्या Adobe Indesign 6 मध्ये भारतीय भाषेसाठी युनिकोड टंकलेखन करता येते.

अधिक माहितीसाठी : http://coe.maharashtra.gov.in/index.php?option=com_content&view=article&id=85&Itemid=294&lang=mr

What is Unicode? | Unicode font | Advantages of Unicode font

>

Information about Unicode fonts –

Unicode is a 16-bit global character encoding standard. It is used primarily by international organizations to develop multilingual software. The Unicode standard has the ability to encode all the characters in all the written languages ​​of the world. The Unicode standard assigns specific numeric values ​​and names to each character. There is an expanded system of 10646 standard called UTF-16 which can encode about one million characters.

>

What is Indian Script Code for Information Interchange (ISCII)? –

The Bureau of Indian Standards has developed the Indian Script Code for Information Interchange (ISCII) standard for use in all computers and media. It allows the use of 7 or 8 bit characters. 1982 (ISO 646 IRV) is a 7 bit coded character set, as defined in what is called ASCII character set. The above 128 characters are used for all Indian scripts based on the ancient Brahmi script. In 7-bit environments, control code SI can be used to order ASCII code sets, and control codes can be used to re-select SO ASCII code sets.

There are 22 official languages ​​in India. Apart from the Persian-Arabic scripts, all the other 10 scripts used for Indian languages ​​are derived from the ancient Brahmi script and have the same pronunciation structure, making it possible to create a common set of characters. A system of features is provided so that various Indian scripts and display features can be used. The extension system allows more characters to be used with the ISCII code. The ISCII code table is a super set of all the characters required for Brahmi based scripts. For convenience, the official script Devanagari alphabet has been used in the standard. The IS 1319: 1991 standard number given by the Bureau of Indian Standards is the most recent Indian standard for information exchange and is widely used for the development of IT products in Indian languages.

What is the basic difference between Unicode and ISCII code? –

Unicode uses 16 bit encoding which gives code points for more than 65000 characters (65536). The Unicode standard assigns a unique numeric value and name to each character. The Unicode standard offers the ability to encode characters used for all written languages ​​around the world. ISCII uses 8-bit code which is an extension of the 7-bit ASCII code, which contains the basic characters required for 10 Indian scripts. There are 22 official languages ​​in India. Apart from the Persian-Arabic scripts, the other 10 scripts used for Indian languages ​​are derived from the ancient Brahmi script and have a similar pronunciation structure, making it possible to form common character sets. The ISCII code table is a super set of all the characters required for Indian scripts based on Brahmi. For convenience, the alphabet of Devanagari official script has been used in the standard.

What is Inscript Keyboard Layout? –

Inscript (Indian Script) is a touch typing keyboard layout system used to type Indic text on a computer. The Government of India has certified this keyboard for Indic Computing. Inscript has the same layout for all Indic scripts. The Inscript (Indian Script) layout is the default option for data entry in Indian languages ​​and all six Indian scripts. This layout uses standard 101 keyboards. This overlay is compatible with any current English keyboard. Characters are mapped in such a way that they are the same for all Indian languages ​​(written from left or right). This is because the set of basic characters for Indian languages ​​is the same. Inscript Keyboard comes with new inbuilt operating system including Windows 2000, XP, VISTA, LINUX, MAC.

Is it possible to type Unicode in COREL DRAW and ADOBE PRODUCTS with the help of ISM V6? –

Unicode is not yet supported in Corel and Adobe for Indian language. Once this product is supported by Unicode, Unicode typing can be done in ISM V6. Currently Adobe Indesign 6 allows Unicode typing for Indian languages.

For more information: http://coe.maharashtra.gov.in/index.php?option=com_content&view=article&id=85&Itemid=294&lang=mr

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top