स्मार्ट ग्राम योजना
प्रस्तावना
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थात ‘इको व्हिलेज’ ही योजना शासनाने बंद करीत नव्या स्वरूपात ‘स्मार्ट ग्राम’ही योजना साकारली आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षात निकषपात्र गावांना निधी स्वरूपात रक्कम मिळत होती; मात्र आता २१ नोव्हेंबर १६च्या शासन निर्णयान्वये ‘स्मार्ट ग्राम’मध्ये तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या गावांनाच भरीव बक्षीस मिळणार आहे
शासन निर्णय
राज्यातील सर्व भागातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम याजनच्या निकषात व स्वरुपात बदल करून राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीस योजनेत सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध होईल अशा पद्धतीने “स्मार्ट ग्राम” या नावाने योजना राबविण्याचा शासन निर्णय घेण्यात येत आहे.
गावांची विभागणी
या योजनेकरीता निवडण्यात येणारी ग्राम पंचायत शासनाकडून देण्यात आलेल्या निकषांच्या आधारे गुणांकन पध्दतीने पारदर्शकता ठेवून निवडली जाणार असून याकरीता गावांची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आलेली आहे.
- मोठया ग्रामपंचायती (५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी)
- शहरालगत असणा-या ग्रामपंचायती
- पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती (अगोदर कार्यक्रमात सहभागी झालेली)
- आदिवासी/पेसा ग्रामपंचायती
- उर्वरीत ग्रामपंचायती
मोठी ग्रामपंचायत, आदिवासी ग्रामपंचायत, शहरालगत असणारी ग्रामपंचायत व पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत यांच्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक दृष्टीकोनातून खूप मोठी तफावत दिसून येते. याकरीता सदरील ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार गुणांकन देण्यात आले आहे. स्वच्छता (Sanitation), व्यवस्थापन (Management), दायित्व (Accountability), अपारंपारिक उर्जा आणि पर्यावरण (Renewable Energy & Environment) व पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर (Transparency & Technology ) संक्षीप्तमध्ये “SMART” या आधारावत हि गुणांकन पद्धत आधारीत असून याकरीता एकूण १०० गुण ठेवण्यात आले आहे. गुण देण्याकरीता आवश्यक निकषाची यादी परिशिष्ट ‘अ’ प्रमाणे आहे.
निवडीची पध्दत :
अ) प्रथम स्तरावर ग्रामपंचायत निवडीची कार्यपध्दती (तालुका स्तर)
जिल्हास्तरावरुन स्मार्ट ग्राम योजनेची प्रसिध्दी करावी. जिल्हातील सर्व ग्रामपंचायतींना योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करून, ग्रामपंचायतींनी “परिशिष्ट-अ” येथील नमुद निकषनुसार स्व-मुल्यांकन करून गुणांकन देण्याबाबत प्रसिध्दी करावी. सदर प्रसिध्दीनंतर सदर योजनेत सहभाग घेवू इच्छिणाच्या संबंधित जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायती स्व-मुल्यांकन करून त्यांचे प्रस्ताव संबंधित पंचायत समिती कार्यालयांस पाठवतील. संबंधित तालुक्यातील प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या एकूण स्व-मुल्यांकन प्रस्तावांपैकी अधिक गुण प्राप्त २५% ग्रामपंचायतीची तालुका तपासणी समिती तपासणी करुन त्यांना गुणांकन देतील. सदर तपासणीकरिता प्रत्येक तालुका स्तरावर तालुका तपासणी समिती सबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गठीत करतील .
ब) द्वितीय स्तरावरुन ग्रामपंचायत निवडीची कार्यपध्दती (जिल्हा स्तर)
तालुकास्तरावरील सर्वाधिक गुण प्राप्त झालेली ग्रामपंचायत तालुका स्मार्ट ग्राम असेल. सदर ग्रामपंचायत जिल्हा स्तरावरील द्वितीय स्पर्धेकरीता पात्र असेल.
बक्षीस रक्कमेचे वितरण व विनीयोग व त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे:
- प्रथम स्तरावर निवडण्यात येणा-या ग्रामपंचायतीकरीता देण्यात येणा-या पारितोषिकाची एकूण रक्कम रु.१०,००,००० X ३५१ तालुके = रू. ३५.१० कोटी राहील.
- द्वितीय स्तरावर निवडण्यात येणा-या ग्रामपंचायतीकरीता देण्यात येणा-या पारितोषिकाची एकूण रक्कम रु. ४०,००,००० X ३४ जिल्हे = रु.१३.६० कोटी राहील. सदर ग्रामपंचायतीस यापूर्वी तालुकास्तरावरील प्राप्त झालेल्या रू. १०.०० लक्ष रोख पारितोषिका व्यतिरिक्त, रु.४०.०० लक्ष रोख या स्वरूपात पारितोषिक दिले जाईल. त्यामुळे जिल्हास्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायतीस एकूण रू.५००० लक्ष इतके पारितोषिक प्राप्त
- प्रथमस्तरावर तालुका स्मार्ट ग्राम म्हणून घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना प्रजासत्ताक दिनी व द्वितीय स्तरावर जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून घोषित ग्रामपंचायतींना महाराष्ट्र दिनी पारितोषिक वितरण करण्यात येईल. प्रथम स्तरावर व द्वितीयस्तरावर निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतींनी शासनाने निर्धारित केलेल्या नाविन्यपूर्ण कामामधूनच (उदा. घनकचरा व्यवस्थापन व त्यापासून खात निर्मिती, RO प्लांट, सौर पथदिवे, बायोमास गॅसिफायर इ.) निवड करणे आवश्यक आहे.
स्मार्ट – ग्राम निवडी साठीचे निकष व गुणांकन
निकष |
गुण |
|
स्वच्छता |
|
२० |
व्यवस्थापन |
|
२५ |
दायित्व |
|
२० |
अपारंपरिक उर्जा व पर्यावरण |
|
२० |
पारदर्शकता व तंत्रज्ञान |
|
१५ |
एकूण |
१०० |