कोजागीरी पोर्णीमेबद्दल माहिती ( kojagiri purnima badal mahiti) –
शरद पौर्णिमा अत्यंत श्रेष्ठ तिथी आहे. हा दिवस कोजागरी व्रत या रुपात देखील साजरा केला जातो. हा दिवस अत्यंत शुभ आणि सकारात्मक असून या दिवशी पूजा करुन मोठमोठाले संकट देखील दूर होतात असे मानले गेले आहे.
![]() |
कोजागीरी पोर्णीमेबद्दल माहिती ( kojagiri purnima badal mahiti) | KOJAGIRI PURNIMA FESTIVAL 2020 WISHES, IMAGES, QUOTES, WHATSAPP MASSAGES, PHOTOS, STATUS |
पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता. म्हणून धन प्राप्तीसाठी ही तिथी सर्वश्रेष्ठ असल्याचे मानले गेले आहे. या दिवशी प्रेमावतार भगवान श्रीकृष्ण, धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा कला असणार्या चंद्राची उपासना करुन वरदान प्राप्त केले जाऊ शकतात. शरद पोर्णीमेलाच कोजागीरी पोर्णीमा असे म्हणतात.
देशातील सर्वच भागामध्ये कोजागिरी पोर्णीमा ही मोठया उत्साहाने साजरी करतात. महायोजना.कॉम वर पाहू या कोजागीरी पोर्णीमा बद्दलची सविस्तर माहिती.
कोजागीरी पोर्णीमेची कथा – kojagiri purnima story
प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन-संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले
शरद (कोजागीरी) पौर्णिमा महत्व ( kojagiri purnima che mahatva )
- शरद पौर्णिमा अत्यंत महत्वपूर्ण तिथी आहे, या तिथीपासून शरद ऋतु आरंभ होते.
- या दिवशी चंद्र संपूर्ण आणि सोळा कला युक्त असतो.
- या दिवशी चंद्र किरणांहून अमृत वर्षा होते ज्याने धन, प्रेम आणि आरोग्य प्राप्ती होते.
- प्रेम आणि कलेने परिपूर्ण असल्यामुळे श्री कृष्णाने याच दिवशी महारास रचले होते.
- या दिवशी विशेष प्रयोग करुन आरोग्य, अपार प्रेम खूप धन प्राप्त करता येऊ शकतं.
- परंतू हे प्रयोग करण्यासाठी काही खबरदारी आणि नियम पालन करण्याची गरज असते.
- शरद पौर्णिमेला काही महाप्रयोग करत असल्यास या तिथीचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे.
- पौर्णिमेला सकाळी इष्ट देवाची पूजा करावी.
- इन्द्र आणि महालक्ष्मी पूजन करुन तुपाचा दिवा लावावा आणि त्याची गन्ध पुष्प इतर वस्तूंने पूजा करावी.
- ब्राह्मणांना खीरीचे भोजन करवावे आणि त्यांना दान- दक्षिणा प्रदान करावी.
- लक्ष्मी प्राप्तीसाठी हे व्रत विशेष रुपाने केलं जातं. या दिवशी जागरण करणार्यांच्या धन-संपत्तीमध्ये वृद्धि होते.
- रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच भोजन करावे.
- मंदिरात खीर व इतर वस्तू दान करण्याचे विधी-विधान आहे.
कोजागीरी पोर्णीमेला करावयाची 8 कामे –
1. नेत्र ज्योती वाढविण्यासाठी रात्री 15 ते 20 मिनिटे चंद्राकडे त्राटक बघावे.
2. शिथिल इंद्रिये पुष्ट करण्यासाठी चंद्राच्या प्रकाशात खीर ठेवली पाहिजे.
3. चंद्र देव, लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवून वैद्यराज अश्विनी कुमारांना प्रार्थना करावी की आमच्या इंद्रियांची तीव्रता आणि तेज वाढावं. नंतर खीरीचे सेवन करावे.
4. शरद पौर्णिमा दम्याच्या रुग्णांसाठी वरदान देणारी रात्र आहे. रात्री झोपू नये. रात्री चंद्र प्रकाशात ठेवलेल्या खीरीचे सेवन केल्याने आजरा बरा होतो.
5. पौर्णिमा आणि आमवस्येला चंद्राच्या विशेष प्रभावाने समुद्रात भरती येते. जेव्हा चंद्र इतक्या विशाल समुद्रात उलथापालथ करत त्याला थरथरण्यासाठी भाग पाडू शकतो तर विचार करा आमच्या शरीरातील जलीय अंश, सप्तधातु, सप्त रंग, यांच्यावर चंद्राचा किती प्रभाव पडत असेल. म्हणून या रात्री कोणत्याही एक मंत्राचे पूर्ण मन लावून ध्यान करावे. 100 टक्के मनोकामाना पूर्ण होईल.
6. या रात्री पांढर्या आसनावर बसून चांदीच्या ताटात मकाने, खीर, तांदूळ आणि पांढर्या फुलाचा चंद्रदेवाला नैवेद्य दाखवावा.
7. शरद पौर्णिमेला पूजा, मंत्र, भक्ती, उपास, व्रत इतर केल्याने शरीर तंदुरुस्त, मन प्रसन्न आणि बुद्धी आलोकित होते.
8. या रात्री सूईत दोरा ओवण्याचा अभ्यास केल्याने नेत्र ज्योती वाढते.
कोजागिरी पौर्णिमेला दूध, बासुंदी किंवा खीर बनविण्याची पद्धत का, जाणून घ्या 5 कारणे –
शरद पौर्णिमेच्या दिवशी आटीव दूध, मसाला दूध, बासुंदी किंवा खीरीचं नैवेद्य दाखवलं जातं. या दिवशी या पदार्थाचे सेवन करण्यामागील कारणे कोणती आहे तसेच त्याचे वैज्ञानिक महत्त्व काय जाणून घ्या-
1 अमृत किरण – असे म्हणतात की या दिवशी आकाशातून अमृत किरणांचा वर्षाव होतो. या किरणांमध्ये अनेक रोगांचा नायनाट करण्याची क्षमता असते. अशामध्ये या किरणांमुळे बाह्य शरीरासह आंतरीक आरोग्यास देखील फायदा मिळतो. म्हणून खीर किंवा दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून मगच सेवन केले जाते. हेच कारण आहे की शरद पौर्णिमेच्या रात्री लोकं आपल्या घराच्या गच्चीवर खीर किंवा दूध ठेवतात.
2 अमृत सम दूध बनतं – असे देखील म्हणतात की या काळात चंद्राशी निगडित प्रत्येक गोष्ट जागृत होते. दूध देखील चंद्राशी निगडित असल्यामुळे अमृत सम बनतं ज्याची खीर बनवून त्याला चंद्राच्या प्रकाशात ठेवतात.
3 हिवाळ्याचा स्वागत – शरद पौर्णिमेपासून हंगामात बदल होण्याची सुरुवात होते. या तिथी नंतर वातावरणात थंडावा होऊ लागतो. हिवाळ्याची सुरुवात होते. शरद पौर्णिमेच्या रात्री खीर खाणं हे या गोष्टीचे प्रतीक आहे की हिवाळ्यात आपल्याला गरम पदार्थांचे सेवन केले पाहिजे, कारण या गोष्टींमुळे हिवाळ्यात सामर्थ्य मिळतं.
4 पौष्टिक पदार्थांचे सेवन – खीर मध्ये दूध, तांदूळ, सुके मेवे हे सर्व पौष्टिक साहित्य टाकले जातात, जे शरीरास फायदेशीर असतात. या गोष्टींमुळे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते. आरोग्य चांगलं राहतं. तसेच खीर जर पौर्णिमेला बनवून खाल्ल्यास याची गुणवत्ता दुप्पट होते.
5 नैवेद्य म्हणून खिरीचे वाटप – अशी देखील मान्यता आहे की पौर्णिमेच्या दिवशी दूध किंवा खीर नैवेद्य म्हणून दिल्यानं चंद्रदोष दूर होतंच तर लक्ष्मीची कृपा देखील मिळते. म्हणून काही ठिकाणी दूध किंवा खीर नैवेद्य म्हणून देतात.
kojagiri purnima aarti कोजागीरी पोर्णीमेसाठी लक्ष्मीची आरती
धार्मिक मान्यतानुसार मां लक्ष्मीचा जन्म शरद पोर्णीमेला म्हणजेच कोजागीरी पोर्णीमेस झाला. या दिवशी माँ लक्ष्मी पृथ्वीलोकाला भेट देतात. हेच कारण आहे की शरद पौर्णिमेच्या दिवशी भाविक पूर्ण विधी पद्धतीने देवी लक्ष्मीची प्रार्थना करतात. असे मानले जाते की या दिवशी जे आई ध्यान व उपासना करताना रात्री जागृत करतात, त्यांची आई लक्ष्मी त्यांच्या घरी येते. अशा परिस्थितीत जेव्हा ती आपल्या भक्तांना पूजा मजकूर गमावताना पाहते तेव्हा ती त्यांना (भक्तांना) त्रास देते. आई लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे. जो भक्त त्याची उपासना करतो त्याला पैशाची किंवा धान्याची कमतरता नसते. शरद पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी पूजा पाठ केल्याने जीवनात आनंद मिळतो आणि कंगाली पळून जाते. शरद पूर्णिमेवर संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर ही आरती वाचा ….
ॐ जय लक्ष्मी माता,
मैया जय लक्ष्मी माता ।
तुमको निसदिन सेवत,
हर विष्णु विधाता ॥
उमा, रमा, ब्रम्हाणी,
तुम ही जग माता ।
सूर्य चद्रंमा ध्यावत,
नारद ऋषि गाता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता…॥
दुर्गा रुप निरंजनि,
सुख-संपत्ति दाता ।
जो कोई तुमको ध्याता,
ऋद्धि-सिद्धि धन पाता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता…॥
तुम ही पाताल निवासनी,
तुम ही शुभदाता ।
कर्म-प्रभाव-प्रकाशनी,
भव निधि की त्राता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता…॥
जिस घर तुम रहती हो,
ताँहि में हैं सद्गुण आता ।
सब सभंव हो जाता,
मन नहीं घबराता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता…॥
तुम बिन यज्ञ ना होता,
वस्त्र न कोई पाता ।
खान पान का वैभव,
सब तुमसे आता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता…॥
शुभ गुण मंदिर सुंदर,
क्षीरोदधि जाता ।
रत्न चतुर्दश तुम बिन,
कोई नहीं पाता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता…॥
जो कोई नर गाता ।
उँर आंनद समाता,
पाप उतर जाता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता…॥
ॐ जय लक्ष्मी माता,
मैया जय लक्ष्मी माता ।
तुमको निसदिन सेवत,
हर विष्णु विधाता ॥
कोजागिरी पोर्णीमा शुभेच्छा Happy Kojagiri –
चंद्राचा शीतल प्रकाश
त्यात दुधाचा गोड स्वाद
असावा गोडवा साखरेचा…
कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साय,
प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात वाढवू ऋणानुबंधाचा हात
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
शरदाचे चांदणे, आणि कोजागिरीची रात्र.. चंद्राच्या मंद प्रकाशात, जागरण करू एकत्र.. दूध साखरेचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे.. आनंदाची उधळण, आपल्या जीवनी होऊ दे… आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी म्हणजे जागरूकेता वैभव, उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप समन्वयाची अनुभूती. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
KOJAGIRI PURNIMA FESTIVAL 2020 WISHES, IMAGES, QUOTES, WHATSAPP MASSAGES, PHOTOS, STATUS
- Why do we celebrate Kojagiri Purnima?
- Why we drink milk on Kojagiri?
- What can we eat on Sharad Purnima?
As the monsoon season ends, the Kojagari Purnima or the Sharad Purnima is celebrated on a full moon day which is considered as a harvest festival of the Hindus. It is said that on this day the earth and the moon are very close to each other and as such the rays from the moon that we receive are very good for the nourishment of the soul and body. In Maharashtra this puja is performed with a lot of grandeur. The devotees offer their prayers to Goddess Laxmi and even observe fast for the whole day. It is believed that during the night the Goddess visit the houses of the devotees and showers her blessings on whoever stays awake on this night. So people try not to fall asleep during the night and sing devotional songs to keep themselves engaged. During this puja, people decorate their houses well with lights and draw rangolis to welcome Goddess Laxmi. It is a festival which welcomes brightness in the lives of the people. Another tradition of this festival is that the devotees have cold milk with rice flakes in the night after the puja is over. This festival is celebrated in different parts of the country in different ways but with the same devotion towards Goddess Laxmi.
DURATION OF THE FESTIVAL
The Kojagiri Laxmi puja is celebrated in Maharashtra for one day on full moon day during the months of September or October.
HIGHLIGHTS/ IMPORTANT RITUALS OF THE KOJAGIRI FESTIVAL
The devotees generally do not intake any solid food on this day and strive on juices and liquids.
In Maharashtra the Kojagari Laxmi Puja is celebrated as a big event in the Kolhapur Mahalaxmi temple where many devotees gather to offer their praying.
The greatest attraction of this puja is the Masala Dudh which is prepared by adding some masalas and a lot of dry fruits.
On this occasion the eldest child of the family is also honored which is a part of this ritual.