सात-बारा (7/12) पाहणे | Online सात बारा उतारा | महाराष्ट्र भूमि अभिलेख 7/12 | 7 12 उतारा महाराष्ट्र 2020 | 7 12 कसा बघायचा | SatBara (7/12) | Online sat bara utara | Maharashtra Land Records 7/12 | 7 12 Uttara Maharashtra 2020 | How to see 7 12 (satbara uatara)

 

सात-बारा (7/12) पाहणे | Online सात बारा उतारा | महाराष्ट्र भूमि अभिलेख 7/12| 7 12 उतारा महाराष्ट्र 2020 | 7 12 कसा बघायचा

   

  21 व्या शतकात संपूर्ण जग हे टेक्नॉलॉजी ने व्यापून टाकले आहे.  महाराष्ट्र शासनाने नागरीकांना जलदगतीने सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर प्रशासनामध्ये केलेला आहे. शेतकऱ्यांना आता सात बारा उतारा काढण्यासाठी व 7/12 उतारा पाहण्यासाठी कोणत्याही तलाठी कार्यालयात न जाताOnline सात बारा उतारा पाहता येणार असून हा 7 12 उतारा महाराष्ट्र 2020 हा शासनाच्या Mahabhulekh 7/12 Online या वेबसाईटवर पाहता येणार आहे. 7 12 कसा बघायचा याची माहिती आपण https://mahayojana.comवर सविस्तरपणे पाहणार आहोत.

   


  ७/१२ चा उतारा म्हणजे काय?

  सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात (रजिस्टर बुक्स). या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकारचेगावचे नमुनेठेवलेले असतात. यापैकीगावचा नमुनानं ७ आणिगावचा नमुनानं १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उताऱ्याला सातबारा उतारा असे म्हणतात.

   

  ७/१२ उतारा काय दर्शवितो?

  प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे सातबारा उताऱ्यावरून कळू शकते. गाव नमुना ७हे अधिकारपत्रक आहे वगाव नमुना १२हे पीक-पाहणी पत्रक आहे. जमीन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हेगाव नमुनेअसतात. बालाजी सातबारा उताऱ्याच्या अगदी वर गाव,तालुका,जिल्हा इत्यादी नमूद केलेले असते. ७/१२ हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो. ७/१२ ची नविन पुस्तके साधारणता १० वर्षानी लिहिली जातात. ७/१२ पीक पाहनी नोंद दर वर्षी केली जाते.

   

  गाव नमुना ७:

  अ) उतार्‍याच्या डाव्या बाजूस भूमापन्/सर्व्हे/गट नं व हिस्सा नं. दाखविलेला असतो.सरकारने प्रत्येक जमिनीच्या गटाला एक नं. दिलेला असतो, त्याला भूमापन किंवा सर्व्हे नं किंवा गट नं म्हणतात. आणि या प्रकारातील जमिनीचा हिस्सा कितवा आहे हे हिस्सा नं मध्ये दाखविलेले असते.त्याजवळच जमिन ज्या प्रकाराने धारण केलेली असते ती भूधारण पद्धती दाखविलेली असते. सदरची जमिन त्या व्यक्तीकडे कशी आली हे त्यावरून कळते.

  1. भोगवटादार वर्ग१ म्हणजे ही जमिन वंशपरंपरेने चालत आलेली,मालकीहक्क असलेली असते.यालाच खालसा असेही म्हणतात.
  2. भोगवटादार वर्ग२ म्हणजे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेल्या जमिनी.जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री,भाडेपट्टा,गहाण,दान्,हस्तांतरण करता येते.
  3. सरकारने विशिष्ट शर्ती किंवा विशिष्ट कामांसाठी किंवा मुदतीसाठी किंवा भाडेपट्ट्याने दिलेली जमिन भूधारणमध्ये मोडते. अशा अटींचा भंग केल्यास सरकार ती काढून घेते.या ईनाम्,वतन वर्गातल्या जमिनी असतात.
  4. भूमापन क्रं.चे स्थानिक नाव या रकान्यात शेतकर्‍याने आपल्या जमिनीला नाव दिलेले असल्यास(खाचर/वाळूखाच) उल्लेख असतो.
  5. त्याखाली जमिनीचेलागवडीचे योग्य क्षेत्रयात जिरायत्,बागायत,भातशेतीचे क्षेत्र याची एकूण नोंद असते.हे क्षेत्र एकर/हेक्टर व गुंठे/आर मध्ये दाखविलेले असते.
  6. त्याखाली पो.ख. म्हणजेपोट खराबाम्हणजे लागवडीस पूर्णतः अयोग्य असे क्षेत्र दाखविलेले असते.यात पुन्हा वर्ग्(अ) म्हणजे शेतातील बांध/नाले/खाणी यांचा समावेश होतो, तर वर्ग(ब) मध्ये रस्ते,कालवे,तलाव व विशिष्ठ कामांसाठी राखून ठेवलेल्या जमिनीची नोंद असते.
  7. त्याखालीआकार‘,जमिनीवर लावण्यात येणारा कर रु./पैसे मध्ये दिलेला असतो.
  8. गाव नमुना ७च्या मध्यभागी मालकाचे किंवा कब्जेदाराचे नाव दिलेले असते.प्रत्यक्ष व्यवहाराच्यावेळी सातबारा उतारा पाहिला असता जर जमिन विकत देणार्‍याच्या नावास कंस केला असेल तर ती त्या जमिनीची मालक नाही असे समजावे.जमिन विकल्यावर अगोदरच्या नावास कंस करून नविन मालकाचे नाव त्याखाली लिहीले जाते.मालकाचे नावाशेजारी,वर्तुळात काही क्रं. दिलेले असतात त्याला फेरफार असे म्हणतात.त्याबद्दल आपण नंतर पाहू.

   

  ब) गावनमुना ७च्या उजव्या बाजूला भूधारकाच्या जमिनीचा खातेक्रमांक व त्याखाली कोणाची कुळवहिवाट असेल तर त्या कुळाचे नाव लिहिलेले असते व खंडाची रक्कम दाखविलेली असते.

  1. इतर हक्कमध्ये मालमत्तेमध्ये इतर अधिकार धारण करणार्‍याच्या नावाची नोंद असते.या सदरात जमिनीसंदर्भात घेतलेले कर्ज फिटलेले आहे की नाही हे पाहायला मिळते.इतर हक्क सदरात लिहिलेला शेरा नीट समजून घेणे आवश्यक असते.
  2. काही वेळेला संपूर्ण जमिन न घेता त्यातील काही भागचं विकत घेतला जातो. अशा भागाला तुकडा असे म्हणतात.इतर हक्क मध्येतुकडेबंदीअसे नमूद केलेले असेल तर ती शेतजमिन असेल तर ती शेतजमिन तुकडे पाडून विकता किंवा विकत घेता येत नाही.
  3. पुनर्वसानासाठी संपादीतअसा शेरा असल्यास सरकारला रस्ते, धरण यासाठी जी जमिन संपादित करायची असेल त्यातील शेतकर्‍याचे पूनर्वसनासाठी सरकार इतर जमिनी संपादित करु शकते. तेव्हा अशी जमिन सरकारचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय विकता येत नाही.
  4. कुळकायदा कलम ४३ च्या बंधनास पात्र राहून असा शेरा असल्यास अशी जमिन जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय विकता येत नाही.
  5. कुळकायदा कलम ८४ च्या बंधनास पात्र असा शेरा असल्यास शेतीवापरासाठी असलेली जमिन विकत घ्यायची असल्यास विकत घेणारी व्यक्ती ही शेतकरी असलीचं पाहिजे.ती व्यक्ती शेतकरी नसल्यास जिल्हाधिकार्‍याकडे अर्ज करून तशी परवानगी घ्यावी लागते.

   

  महाभूलेख 7/12 ऑनलाइन अभिलेख पोर्टल काय आहे? What is Mahabhulekh 7/12 online abhilekh portal?

  महाराष्ट्र शासनाने online bhulekh portal सुरू केलेले असून याचा मूळ हेतु हा राज्यातील शेतकऱ्यांना सातबारा उतारा व8 अ चा उतारा ( 7 12 and 8 a ) ऑनलाईन पाहता यावा तसेच तो उतारा प्रिंट सुध्दा काढता येणार आहे. राज्यातील सर्व जमीनींची नोंद या पोर्टल वर करण्यात आलेली असून या मध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या जमीनीची नोंद आहे. Mahabhulekh 7/12 Online मूळे प्रशासनातील काम जलदगतीने झाले असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला असून वेळेची बचत झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली पहायला मिळते.

  यापूर्वी Online सात बारा उताऱ्याची सुविधा ही   mahabhulekh.maharashtra.gov.in या पोर्टल देण्यात आलेली होती परंतु शेतकऱ्यांच्या समस्यांच्या दृष्‍टीने या पोर्टल ऐवजी शासनाने https://bhulekh.mahabhumi.gov.in/ हे पोर्टल विकसीत केलेले असून हे पोर्टल पूर्णपणे  अद्यावत केलेले आहे.

   https://bhulekh.mahabhumi.gov.in/  या पोर्टलवर कोणताही शेतकरी अगदी मोबाईलवर सहजरीत्या Online 7/12 ( ऑनलाईन सात बारा उतारा), 8 अ चा उतारा ( 8 a Utara ), खासरा पत्रकKhasra Patrak, जमीनीचा नकाशा Map of Land ऑनलाईन पाहू शकतो.

   

  महाभुलेख पोर्टल वर कोणकोणत्या जिल्हयातील 7 12, 8 , खासरा व जमीनीचा नकाशा पाहू शकतो?

  1. अमरावती (Amravati)
  2. अहमदनगर (Ahmednagar)
  3. अकोला (Akola)
  4. औरंगाबाद (Aurangabad)
  5. बीड (Beed)
  6. ठाणे (Thane)
  7. पालघर (Palghar)
  8. उस्मानाबाद (Usmanabad)
  9. वर्धा (Wardha)
  10. वाशिम (Washim)
  11. भंडारा (Bhandara)
  12. बुलढाना (Buldhana)
  13. जालना (Jalna)
  14. जळगांव (Jalgaon)
  15. कोल्हापुर (Kolhapur)
  16. लातूर (Latur)
  17. नागपुर (Nagpur)
  18. नांदेड (Nanded)
  19. नंदुरबार (Nandurbar)
  20. नासिक (Nashik)
  21. परभनी (Parbhani)
  22. पुणे (Pune)
  23. चंद्रपुर (Chandrapur)
  24. धुले (Dhule)
  25. गडचिरोली (Gadchiroli)
  26. गोंदिया (Gondia)
  27. हिंगोली (Hingloi)
  28. रायगढ़ (Raigad)
  29. रत्नागिरी (Ratnagiri)
  30. सांगली (Sangli)
  31. सतारा (Satara)
  32. सिन्धुदुर्ग (Sindhudurg)
  33. सोलापुर (Solapur)
  34. यवतमाळ (Yavatmal)

   

  mahabhulekh online 7 12 कसा बघायचा?

  1.     7 12 सातबाराचा उतारा पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या सातबारा उतारा असलेल्या अधिकृत  https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईट वर क्लिक करावे.

  2.     विभाग निवडूनGo या बटनावर क्लिक करावे. (उदा. औरंगाबाद निवडून Go या बटनावर क्लिक करा)

  3.     त्यानंतर ज्या जिल्हयामध्ये जमीनीची नोंद आहे ती पाहण्यासाठी तो जिल्हा, तालुका, गाव निवडा त्यानंतर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव पहा किंवा सर्व्हे नंबर टाकून 7/12 (satbara utara) पहा यावर क्लिक करा.

  4.     त्यानंतर अधिकृत असलेला 10 अंकी मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.

  5.     देण्यात आलेला कॅप्चा प्रविष्ट करा व सबमीट बटणावर क्लिक करा.

  6.     सर्व माहिती तपासून झाल्यावर Mahabhulekh 7/12 Online वर  7 12 (satbara utara)  दिसेल.

  7.     यावर आपला खाते क्रमांक, शेतकऱ्यांचे नाव, सर्व्हे क्रमांक, शेतकऱ्याच्या नावाने असलेली जमीन, जमीनीवरील बँकेचा बोजा, सामाईक विहीर, पोटलागवडीस खराब क्षेत्र इत्यादींची माहिती मिळेल.

   

  तर मित्रांनो ही आहे सातबारा विषयक माहिती.  Mahabhulekh 7/12 Online देण्यात आलेली 7 12 महाराष्ट्र 2020  बद्दलची माहिती आवडल्यास Share बटनावर‍ क्लिक करून कृपया इतरांनाही पाठवा.

   

  SatBara (7/12) | Online sat bara utara | Maharashtra Land Records 7/12 | 7 12 Uttara Maharashtra 2020 | How to see 7 12 (satbara uatara)

   

  In the 21st century, the whole world is covered by technology. The Government of Maharashtra has made full use of technology in the administration to provide fast service to the citizens. Farmers will now be able to view 7/12 utara online without going to any talathi office to get 7/12 utara and this 7 12 utara Maharashtra 2020 will be available on the government’s website Mahabhulekh 7/12 Online. We will see in detail how to view 7 12 at https://mahayojana.com.

   

  What is the transcript of 7/12?

  Satbara Utara is a kind of mirror of the land. Because by reading this transcript, you can get a complete estimate of the land where you are sitting without going to the actual land. Under the Maharashtra Land Revenue Act, 1971, various records are kept regarding the rights of agricultural land. There are different registration books for this. This register includes clan ownership rights, agricultural land rights, including crop rights. In addition, 21 different types of ‘village samples’ are kept. Of these, ‘Village Sample’ No. 7 and ‘Village Sample’ No. 12 together form seventeen utara. That is why it is called Satbara Utara.

   

  What does the 7/12 passage show?

  Every landowner can know how much and what land he owns from the seventeen transcripts. ‘Gaon Namuna 7’ is the authority sheet and ‘Gaav Namuna 12’ is the crop inspection sheet. These ‘village samples’ are available at each village talathi for land and revenue management. Villages, talukas, districts etc. are mentioned just above the Satbara Uttara. 7/12 is the primary and final proof of land ownership. New books of 7/12 are usually written after 10 years. 7/12 crop inspection is recorded every year.

   

  Village Sample 7:

  A) Land Survey / Survey / Group No. and Part No. on the left side of the landing. The government has given a no. To each land group. Given, it is called Survey No. or Group No. And what is the share of this type of land is shown in part no. It shows how the land came to that person.

  1. Occupant class 1 means this land is inherited and owned. It is also called Khasara.
  2. Occupant class 2 is the land given by the government to the minority or landless. This land can be sold, leased, mortgaged, donated only if the Collector gives permission.
  3. Land leased by the government for certain conditions or for certain works or for a period or for rent. In case of violation of such conditions, the government will take it away.
  4. The local name of Survey No. is mentioned in this column if the farmer has given a name to his land.
  5. Below this, the ‘suitable area for cultivation’ of the land has a total record of arable, horticultural, paddy cultivation area. This area is shown in acres / ha and gunthe / r.
  6. Under it, P.K. This means that the area is shown to be completely unsuitable for cultivation. This again includes category (a) i.e. farm dams / nallas / mines, while category (b) contains records of roads, canals, lakes and land reserved for specific works. .
  7. Under it, ‘size’, tax levied on land is paid in Rs. / Paise.
  8. The name of the owner or occupier is given in the middle of village sample 7. If the name of the seller of the land is bracketed during the actual transaction, it should be considered that he is not the owner of the land. After selling the land, the name of the new owner is written under it. Some no. What is given is called change. We will see about that later.

   

  B) If there is an account number of the land holder’s land on the right side of village sample 7 and whose clan is under it, then the name of the clan is written and the amount of the block is shown.

  1. The ‘Other Rights’ contains the name of the person holding the other rights in the property. This section shows whether the loan taken in respect of land is fit or not.
  2. Sometimes part of it is bought without taking the whole land. Such an area is called a piece of land. If it is mentioned in other claims as ‘fragmentation’, then if it is agricultural land, then it cannot be bought or sold by tearing it down.
  3. The government may acquire other lands for the rehabilitation of the farmers in the land which it wants to acquire for roads and dams if there is a remark ‘modified for rehabilitation’. Therefore, such land cannot be sold without final decision of the government.
  4. Such land cannot be sold without the permission of the Collector if there is such a remark subject to section 43 of the Clan Act.
  5. If there is a remark which is subject to section 84 of the Clan Act, then the person purchasing the land for agricultural use must be a farmer. If the person is not a farmer, he has to apply to the District Collector and get such permission.

   

   

  Mahabhulekh 7/12 What is an online archive portal? What is Mahabhulekh 7/12 online abhilekh portal?

  The Government of Maharashtra has launched an online bhulekh portal, the main purpose of which is to enable farmers in the state to view the transcripts of Satbara Utara and 8a (7 12 and 8 a) online as well as print the transcript. All the lands in the state are registered on this portal and the lands of all the farmers in the state are registered in this portal. Mahabhulekh 7/12 Online Due to this the work in the administration has been done faster and all the farmers in the state have benefited from it and the time saved has seen an increase in the income of the farmers.

  Earlier, the portal mahabhulekh.maharashtra.gov.in was provided with the facility of online 7-12 transcripts, but in view of the problems of farmers, instead of this portal, the government has developed the portal https://bhulekh.mahabhumi.gov.in/and this portal has been completely updated. .

   https://bhulekh.mahabhumi.gov.in/On this portal any farmer can easily get online 7/12 (online seven twelve utara), 8 a utara (8 a Utara),  Khasra Patrak, land map Map of Land Can watch online.

   

  On the Mahabhulekh portal you can see maps of 7 12, 8 A, Khasra and land in which district?

  1. Amravati
  2. Ahmednagar
  3. Akola
  4. Aurangabad
  5. Beed
  6. Thane
  7. Palghar
  8. Osmanabad
  9. Wardha
  10. Washim
  11. Bhandara
  12. Buldhana
  13. Jalna
  14. Jalgaon
  15. Kolhapur
  16. Latur
  17. Nagpur
  18. Nanded
  19. Nandurbar
  20. Nashik
  21. Parbhani
  22. Pune
  23. Chandrapur
  24. Dhule
  25. Gadchiroli
  26. Gondia
  27. Hingloi
  28. Raigad
  29. Ratnagiri
  30. Sangli
  31. Satara
  32. Sindhudurg
  33. Solapur
  34. Yavatmal

   

  How to view mahabhulekh online 7 12 ?

  1. To view the transcript of 7 12 Satbara, first click on the official website of the Government of Maharashtra with the transcript of Satbara https://bhulekh.mahabhumi.gov.in/.
  2. Select the section and click on Go button. (E.g. select Aurangabad and click on Go button)
  3. Then to see the district in which the land is registered, select the district, taluka, village, then see the full name of the farmer or enter the survey number and click on 7/12 (satbara utara).
  4. Then enter the authorized 10 digit mobile number.
  5. Enter the given captcha and click on submit button.
  6. After checking all the information, Mahabhulekh 7/12 Online will see 7 12 (satbara utara).
  7. It will contain your account number, name of the farmer, survey number, land in the name of the farmer, bank burden on the land, common well, bad area of ​​Potlagwadis etc.

   

  So friends, this is information about Satbara. Mahabhulekh 7/12 Online 7 12 Utara provided If you like the information about Maharashtra 2020, please send it to others by clicking on the Share button.

   

  1 thought on “सात-बारा (7/12) पाहणे | Online सात बारा उतारा | महाराष्ट्र भूमि अभिलेख 7/12 | 7 12 उतारा महाराष्ट्र 2020 | 7 12 कसा बघायचा | SatBara (7/12) | Online sat bara utara | Maharashtra Land Records 7/12 | 7 12 Uttara Maharashtra 2020 | How to see 7 12 (satbara uatara)”

  Leave a Comment