जमीन खरेदी / प्लॉट खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी – ७/१२ उतारा कसा पाहावा
पैसा गुंतवल्याने वाढत जातो त्यामूळे सर्वजण कमावलेला पैसा हा बचत करून गुंतवणूक करत असतात. पैसा गुंतवणूकीचा सर्वांना आवडणारा व जास्तीत जास्त पैसे कमावून देणारा मार्ग म्हणजे जमीन खरेदी करणे हा होय. परंतु जमिन खरेदी करताना काही महत्वपूर्ण बाबींची खातरजमा करावी लागते नाहीतर फसवेगिरी होण्याचा धोका जास्तीत जास्त असतो.
![]() |
N.A. Plot जमीन खरेदी करताना पहावयाच्या 12 महत्वपूर्ण बाबी | Jamin / Plot Khardi Kartana kay pahave |
जमीन खरेदी करणे हा बराचसा किचकट व्यवहार आपण समजतो. पण त्यातील काही आवश्यक नियमांची माहिती खरेदी करण्याआधी घेऊन आपण खात्रीशीर व्यवहार नक्कीच करू शकतो. आज आपण जमीन खरेदी करण्याआधी कुठली प्रार्थमिक काळजी घ्यावी याविषयी बोलू.
जमिनीचा सातबारा उतारा पाहणे किंवा काढणे
ज्या गावातील जमींन खरेदी करावयाची असेल तेथिल गावच्या तलाठ्या कडून जमिनीचा सध्याचा सातबारा काढून घ्यावा. किंवा शासनाच्या भुमीअभिलेख या अधिकृत वेबसाईट वरून प्रिंट काढून घ्यावा. त्यावर असलेले फेरफार व “आठ अ” तपासून पाहावा. सातबारा पहाताना “वर्ग १” नोंद असली तर ती जमीन विक्री करणा-याची स्वतःच्या मालकी वहिवाटीची असून सदर जमीन खरेदी करण्यास विशेष अडचण येत नाही.
परंतु नि.स.प्र.(नियंत्रित सत्ता प्रकार किवा “वर्ग २”) अशी नोंद असेल तर सदर जमीन कुळ वाहिवाटी मार्फत मिळविलेली असते. अशी जमीन खरेदी करणे पूर्वी संबंधित कुळाला विक्री करण्यासाठी प्रांत अधिकारी यांची परवानगी घेणे अपरिहार्य ठरते. ही परवानगी खरेदी करते वेळी घेणे आवश्यक असते. या करीता “३२ म” प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यासाठी साधारणत: महिनाभराचा कालावधी लागतो. प्रांत अधिकारी यांची परवानगी मिळल्यावर खरेदीखत करता येते.
N.A. Plot जमीन खरेदी करताना पहावयाच्या 12 महत्वपूर्ण बाबी-
N.A. Plot किंवा जमीन खरेदी करताना खालील प्रकारच्या 12 महत्वपूर्ण बाबींची खातरजमा करावी.
- जमिनी पर्यंतचा रस्ता – जमीन बिनशेती असल्यास जमिनी पर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवीलेला असतो परंतु जमीन बिनशेती नसल्यास व खाजगी रस्ता असल्यास रस्त्यासाठी दाखवीलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करावी.
- आरक्षीत जमिनी – शासनाने सदर सदर जमिनी मध्ये कोणत्याही करणासाठीचे आरक्षण उदा. हिरवा पट्टा पिवळा पट्टा इं. नसल्याची खात्री करावी.
- वाहिवाटदार – सातबारावरील मुळ मालक व प्रत्यक्ष जमिनीचा वहिवाटदार वेगवेगळे असू शकतात याची खात्री कारावी.
- सातबारावरील नावे – सातबारावरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तीचीच आहे का ते पहावे. त्यावर मयत व्यक्ती किवा जुना मालक इतर वारसांची नावे असल्यास ती काढून घेणे आवश्यक असते.
- कर्जप्रकरण, न्यायालयीन खटला व भाडेपट्टा – जमिनीवर कोणत्याही बॅंक किवा संस्था यांच्या कर्जाचा बोजा नसल्याची खात्री करावी. तसेंच न्यायालायीन खटला चालू असल्यास संदर्भ तपासून पहावे. कोणतीही जमीन खरेदी करताना प्रथम वकिलाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- जमिनीची हद्द – जमिनीची हद्द नकाशा प्रमाणे मोजून तपासून घ्यावी. व लगतच्या जमीन मालकांची हरकत नसल्याची खात्री करावी.
- इतर अधिकारांची नोंद – सातबारावर इतर अधिकारमध्ये नावे असतील तर आवश्यक ती माहिती करूं घेणे. किवा बक्षीसपत्राने मिळलेल्या जमिनींची विशेष काळजी घ्यावी.
- बिनशेती करणे – शेतघर सोडून कोणत्याही कारणासाठी बांधकाम करावयाचे असल्यास बांधकामाच्या प्रकारा प्रमाणे बिनशेती करणे आवश्यक असते शहरात असल्यास योग्य त्या ऑथॉरिटी प्रमाणे करावे.
- संपादित जमिनी – सदर जमिनीमधून नियोजित महामार्ग, रेल्वे मार्ग, तलाव इ. नसल्याची खात्री करावी. याची सातबारावर नोंद पहावी. तसेच जमिनिच्या बाजूने रस्ता, नदी, महामार्ग, असेल तर त्यापासूनचे योग्य अंतर सोडून पुरेशी जमीन असल्यास खरेदी करावी.
- खरेदीखत – तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व आवश्यक शुल्क भरून खरेदीखत करावे.
- योग्य कालावधी नंतर खरेदी केलेल्या जमिनिचा नकाशा व आपल्या नावे सातबारा आहे का याची खात्री करावी.
- महसूल विभागाचे शासन नियम हे नेहमी सारखेच राहत नाहीत. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी बदलणारे शासन नियम पडताळून पहावेत.
अशाप्रकारे वरील काळजी ही जमीन खरेदी करताना घ्यावी लागते जेणेकरून जमीन खरेदी केल्यानंतर पश्चाताप होणार नाही.
ही माहिती आवडल्यास कृपया इतरांनी शेअर करा.
Jamin / Plot Khardi Kartana kay pahave –
Money grows by investing so everyone is investing the money they earn. The most popular and most lucrative way to invest money is to buy land. But when buying land (Jamin Kharedi), some important things have to be ensured otherwise the risk of fraud is maximum.
We understand that buying land is a very complicated business. But we can certainly make sure transactions by taking the knowledge of some of the essential rules before buying. Today we will talk about what primary care should be taken before buying land.
Jaminicha Satbara ( Land Record 7/12)
The present Satbara of the land should be removed from the village talatha of the village in which the land is to be purchased. Or print it out from the official land records of the government. Check the changes and “Eight A” on it. If you look at Satbara, if there is a “Class 1” record, then the land is owned by the seller and there is no problem in buying the land.
But if there is a record of NSP (Controlled type of power or “Class 2”) then the land is acquired through clan occupation. Prior to purchasing such land, it is unavoidable to get permission from the provincial authorities to sell it to the concerned clan. This permission must be obtained at the time of purchase. For this “32M” certificate and other documents have to be fulfilled. This usually takes about a month. Purchases can be made with the permission of the provincial authorities.
The following should be considered when purchasing N.A-Plot land –
Jamin kharedi karatana pahavayachya 12 mahatvapurna babi
- Road to land – If the land is uncultivated, the road to land is shown in the map, but if the land is not uncultivated and if it is a private road, the land shown for the road and the owner concerned should have no objection.
- Reserved lands – The government has reserved these lands for any purpose e.g. Green belt yellow belt en. Make sure not to.
- Tenants – It should be ensured that the original owners of Satbara and the occupants of the actual land may be different.
- Names on Satbara – See if the names on Satbara belong to the seller. It must be removed if it contains the names of the deceased or other heirs of the deceased owner.
- Debt cases, court cases and leases – make sure that there is no debt burden of any bank or institution on the land. Also, if the court case is ongoing, the context should be checked. It is important to consult a lawyer when purchasing any land.
- Land Boundary – Land Boundary should be measured and checked as per the map. And ensure that the adjacent landowners do not mind.
- Record of other rights – If there are names in other rights on Satbara, to get the necessary information. Or special care should be taken of the lands acquired by the prize.
- Non-farming – If you want to build for any reason other than farming, you need to do non-farming according to the type of construction.
- Acquired lands – From these lands planned highways, railway lines, lakes etc. Make sure not to. It should be noted on Satbara. Also, if there is a road, river, highway on the side of the land, leave it at a suitable distance and buy it if there is enough land.
- Purchase deed – Purchase deed should be done by fulfilling the required documents and paying the required fee in the office of the Secondary Registrar in the taluka.
- Make a map of the land purchased after the appropriate period and make sure that you have Satbara in your name.
- The rules of the revenue department do not always remain the same. The rules that change from time to time should be checked to meet the required documents.
Thus the above care has to be taken while purchasing the land so that there will be no regrets after purchasing the land.
If you like this information, please share it with others.
Good