पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप) माहिती, फायदे, | Post-Matric Tuition Fee and Examination Fee (Freeship) information and benefits

पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)

   पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)

  पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप) योजना ही महाराष्ट्र शासनाच्या  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेमार्फत राबविण्यात येते. या योजनेचा हेतु हा राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रूची निर्माण करणे, त्यांना आर्थीक मदत देवून विद्यार्थ्यांची गळती कमी करणे हा योजनेचा मुख्य हेतू आहे. पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप) योजनेच्या नावातच सर्व काही असल्याप्रमाणे विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिले जाणारे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क, जे अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहे, ते या योजनेत समाविष्ट आहे. या सरकारी योजना बद्दल ची माहिती सविस्तर पणे पाहू या महायोजना वर

  पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप) माहिती, फायदे, | Post-Matric Tuition Fee and Examination Fee (Freeship) information and benefits

  Department Name

  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

  पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप) योजनेबद्दल –

  १. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे

  २. उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे

  ३. शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी गळती प्रमाण कमी करणे

  ४. उच्च शिक्षणाद्वारे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे.

  ५. पारदर्शकता, ऐक्य आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.

  ६. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क जसे की, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर अनुज्ञेय शुल्क यांची परतफेड प्रदान करण्यात येईल.

  पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप) चे फायदे –

  विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिले जाणारे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क, जे अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहे, ते या योजनेत समाविष्ट आहे.

  पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप) साठी पात्रता –

  • आई-वडिलांचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २,५०,००० पेक्षा जास्त असावे.

  • विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा.

  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा

  • विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.

  • शासकीय मान्यताप्राप्त असलेली आणि महाराष्ट्रात स्थित असलेली संस्था असावी.

  • विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केवळ CAP माध्यमातून प्रवेश घेतलेला असावा.

  • संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीत केवळ एकदा अनुत्तीर्ण ग्राह्य धरले जाईल.

  पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप) साठी आवश्यक कादपत्रे –

  या योजनेसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

  • उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांनी प्रदान केलेले)

  • जात प्रमाणपत्र.

  • जात पडताळणी प्रमाणपत्र

  • गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका

  • १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका

  • वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

  • वसतिगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

  • CAP फेरी वाटप पत्र

  Post-Matric Tuition Fee and Examination Fee (Freeship)

  Post Matriculation Tuition Fee and Examination Fee (Freeship) Scheme is implemented by the Department of Social Justice and Special Assistance, Government of Maharashtra. The main objective of the scheme is to create interest in education among the students in the state and to reduce the dropout rate by providing financial assistance to them. The post-matric tuition fee and examination fee (freeship) scheme are all in the name of the scheme. Let’s see the details of this government scheme in detail on this master plan

  Department Name

  Social Justice and Special Assisstance

  About Post-Matric Tuition Fee and Examination Fee (Freeship)

  1) Create interest in education among students.

  2) Making financial assistance available for higher education.

  3) To reduce the drop in education leakage.

  4) Creating opportunities for financial growth through higher education.

  5) Scholarship scheme to avoid transparency, unity and delay.

  6) All types of compulsory fees such as Tuition fees, Exam Fees and other admissible fees are reimbursed to the concern SC category student.

  Benefits of Post-Matric Tuition Fee and Examination Fee (Freeship)

  • Tuition Fees, Exam Fees & other fees which are mandatory or compulsorily payable by the student to the institution are covered under the scheme.

  Eligibility for Post-Matric Tuition Fee and Examination Fee (Freeship)

  • The parents / Guardian annual income above Rs. 250000.to unlimited.

  • Student category should be Scheduled caste or Neo bouddhist

  • Student should be resident of Maharashtra

  • Student should be passes SSC/equivalent Matric.

  • Institute should be located in Maharashtra & shall be government recognized.

  • For Professional Courses student should admit through CAP round only

  • Only 1 Failure is allowed in whole curriculum.

  Renewal Policy

  Documents Required for Post-Matric Tuition Fee and Examination Fee (Freeship)

  • Income Certificate (Provided by Tahesildar).

  • Cast Certificate.

  • Cast Validity Certificate

  • Mark sheet for last appeared examination

  • Mark sheet for SSC or HSC

  • Father date Certificate(if required)

  • Hostel Certificate (if required)

  • CAP round allotment letter

  Leave a Comment