शैक्षणिक कर्ज योजना, उद्देश, प्रमुख अटी, लाभाचे स्वरुप
शैक्षणिक कर्ज योजना ही केंद्र शासन पुरस्कृत असून महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जाते. शैक्षणिक कर्ज योजना ही सरकारी योजना अनूसुचित जाती तील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू आहे. या योजनेची माहिती सविस्तरपणे पाहू या महा योजना वर

शैक्षणिक कर्ज योजनेचा प्रकार
केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना
शैक्षणिक कर्ज योजनेचा उद्देश
अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव
शैक्षणिक कर्ज योजना ही अनुसूचित जातीतील चर्मकार समाज बांधवांना लागू आहे.
शैक्षणिक कर्ज योजनेच्या प्रमुख अटी
- अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
- अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
- ( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
- (ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.
- जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
- अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
- महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
शैक्षणिक कर्ज योजना लाभाचे स्वरुप
एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या कर्ज योजने अंतर्गत सन २००९ या वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज मर्यादर देशात शिक्षणसाठी रु.१० लाख व परदेशासाठी रु.२० लाख इतकी आहे. या कर्जावर ४ टक्के व्याजदर आकारण्यात येतो.
शैक्षणिक कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा
शैक्षणिक कर्ज योजनेच्या अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.
अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.
संपर्क कार्यालयाचे नांव – प्रत्येक जिल्हास्तरावर असलेले समाजकल्याण अधिकारी
Educational Loan Scheme, Objective, Eligibility Criteria, Benefits Provided
The educational loan scheme is sponsored by the Central Government and is implemented by the Social Welfare Department of the Government of Maharashtra. Educational Loan Scheme (Shaikshanik Karja Yojana) is a government scheme applicable to students studying in Scheduled Castes. Let’s see the details of this scheme in detail on this Maha Yojana
Shaikshanik Karja Yojana Funding by
Central Government Schemes National Scheduled Castes Finance and Development Corporation, New Delhi (NSFDC)
Shaikshanik Karja Yojana Objective
The main object of the Corporation is to implement various schemes to uplift the lifestyle of Charmakars (Dhor, Chambhar, Holar, Mochi, etc.) who are economically weak and below the poverty line and to develop them educationally, economically, and socially to give them a respectable place in Society. Also, the production of various types of Footwear Leather Articles supply to Government Departments for sale in Open Market.
Beneficiary Category –
SC – Charmakar.
Educational Loan Scheme Eligibility Criteria
- Applicant must be of Charmakar Community only.
- Age Limit should be in between 18 to 50 years
- For 50% Subsidy Scheme and Margin Money, Annual Income of the applicants must be below the poverty line and for NSFDC Scheme, income for Rural area should be below 98,000/- and for Urban Rs.1,20,000/-.
- Applicants must be permanent residents of Maharashtra State.
- He must produce the Income and Caste Certificate of Authorised Govt. Officer.
- Applicant must have knowledge of the business for which he has applied for the loan.
Educational Loan Scheme Benefits Provided
NSFDC, New Delhi has implemented the EDUCATION LOAN scheme from 2009. Under this scheme, Eduction Loan up to Rs.10,00,000/-finance is provided for postgraduate students in India and Rs. 20,00,000/- in abroad. The rate of interest is 4%p.a. for Male 3.5%p.a. for the Female beneficiary.
How to Apply for Shaikshanik Karja Yojana
The application form is available at the District Office of DCOM.
Applicant must fill the form and submit it to District Office of DCOM
Contact Office – Samajkalyan Adhikari