Government of India Post-Matric Scholarship information, benefits, eligibility | भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना माहिती, फायदे, पात्रता

 भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना

  भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजने बद्दल –

  भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना ही भारत सरकार पुरस्कृत असून ही महा योजना महाराष्ट्र शासनाच्या  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेमार्फत राबविण्यात येते. समाजातील वंचीत गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे त्यांची शिक्षणातील गळती कमी होण्यासाठी शासनाने भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना सुरू केली असून या योजनेची सविस्तर माहिती पाहू या महायोजना वर 

  भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना

  Department Name

  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

  Overview

  १. शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.

  २. शिक्षण गळती कमी करण्यासाठी.

  ३. उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.

  ४. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.

  ५. पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.

  ६. फक्त अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जातो.

  ७. अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न रु. 2,50,000 किंवा त्यापेक्षा कमी असावे.

  भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेचे फायदे –

  या योजनेअंतर्गत नवबौध्द / अनुसूचित जातीतील पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे लाभ मिळतील :

  १. प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत गट १, गट २, गट ३, गट ४, प्रति महिना (अधिकतम १० महिने) याप्रमाणे देखभाल भत्ता प्रदान केला जातो.

  डे स्कॉलर : (दरमहा रुपयांमध्ये)

  गट १ : ५५०

  गट २ : ५३०

  गट ३ : ३००

  गट ४ : २३०

  होस्टेलर : (दरमहा रुपयांमध्ये)

  गट १ : १२००

  गट २ : ८२०

  गट ३ : ५७०

  गट ४ : ३८०

  शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे दिव्यांग (अपंगत्व प्रकार) असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त भत्ते पुढीलप्रमाणे :

  अपंगत्वाचे प्रकार : (दरमहा रुपयांमध्ये)

  अंधत्व / कमी दृष्टी गट १ आणि २ : १५०

  गट ३ : १२५

  गट ४ : १०० शासन निर्णय (अ) नुसार अतिरिक्त भत्ते

  कुष्ठरोग निवारण झालेले सर्व गटांसाठी

  १. वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)

  २. एस्कॉर्ट भत्ता १०० / –

  ३. वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता १००/- अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी) प्रमाणे

  कर्णबधीर सर्व गटांसाठी.

  १. वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)

  शासन निर्णय (बी) नुसार अतिरिक्त भत्ते

  लोकोमोटर अपंगत्व सर्व गटांसाठी :

  १. वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)

  शासन निर्णय (बी) नुसार अतिरिक्त भत्ते

  मानसिक दुर्बलता / मानसिक आजार सर्व गटांसाठी:

  १. वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)

  २. एस्कॉर्ट भत्ता १०० / –

  ३. वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता १००/-

  ४. अतिरिक्त प्रशिक्षण भत्ता १५० / – अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी, इ) प्रमाणे

  ऑर्थोपेडिक अपंगत्व सर्व गटांसाठी:

  १. वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)

  २. एस्कॉर्ट भत्ता १०० / –

  ३. वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता. १०० / – अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी) प्रमाणे

  ३) विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिल्या जाणाऱ्या देखभाल भत्ता व्यतिरिक्त सर्व अनिवार्य शुल्क / अनिवार्य देय शुल्क अर्थात वित्तपुरवठा (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क) इ. या योजनेखाली समाविष्ट केले आहे.

  भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्रता –

  १. आई-वडिलांचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.

  २. विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा.

  ३. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा

  ४. विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.

  ५. अयशस्वी : विद्यार्थी प्रथम वर्षी नापास झाला तरी त्याला परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता अनुज्ञेय राहील, एकाच वर्गात दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला / तिला कोणताही भत्ता मिळणार नाही. आणि दोन प्रयत्नानंतर विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेल्यास लाभ अनुज्ञेय राहतील.

  ६. महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भारतसरकारच्या नियमानुसार समान नियम अनुज्ञेय राहतील.

  ७. फक्त २ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी.

  भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –

  • उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार द्वारे प्रदान)

  • जात प्रमाणपत्र.

  • गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका

  • १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका

  • वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

  • शिक्षणातील खंड बाबतचे आणि स्व:घोषणापत्र (आवश्यक असल्यास)

  • वसतिगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

  • पतिचे उत्पन्न प्रमाणपत्र (अर्जदार जर स्त्री आहे आणि विवाहीत असल्यास) 

  भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना  ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी – 

  भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना ही वंचीत व अपंग विद्यार्थ्यांसाठी राबवीली जात असून या योजनेचा अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेलल्या लिंक वर भेट देवून अर्ज भरा

  https://mahadbtmahait.gov.in/

  Government of India Post-Matric Scholarship.

  About Government of India Post-Matric Scholarship Scheme –

  Government of India Post-Matric Scholarship Scheme is sponsored by the Government of India and is implemented through the Department of Social Justice and Special Assistance, Government of Maharashtra. The Government of India has launched the Post-Matric Scholarship Scheme to help students from the underprivileged sections of the society to get higher education.

  Department Name

  Social Justice and Special Assisstance

  Overview

  1) Providing financial assistance for education.

  2) Providing financial assistance for education.

  3) To reduce the drop in education leakage.

  4) Creating a passion for higher education.

  5) Providing students the opportunity to go to the mainstream of education through education.

  6) Scholarship scheme to avoid transparency, co-ordination and delay.

  7) Benefits of Tuition Fees, Exam Fees and Maintenance Allowance are paid to only SC category students.

  8) Candidate family income should be less than or equal to 2,50,000/-

  Benefits of Government of India Post-Matric Scholarship

  Under this Scheme the eligible SC/ Neo Buddhist students are paid benefits as bellow.

  1) Maintenance Allowance is provided as per Group I, Group II, Group III, Group IV per month from date of admission to date of exam (max 10 months)

  Day Scholar: (Amount in Rupees per month)

  • Group I 550

  • Group II 530

  • Group III 300

  • Group IV 230

  Hosteller (Amount in Rupees per month)

  • Group I 1200

  • Group II 820

  • Group III 570

  • Group IV 380

  2) Additional allowances for SC students with disabilities(Type wise disabilities) as mentioned in GR are as follows,

  Type of Disability Allowances(Rs per month) Remark

  Blindness/Low vision Grp I & II – 150/-

  Grp III – 125/-

  Grp IV – 100/- As per GR (A) of additional allowances

  Leprosy cured All Groups:

  i) Transportation Allowance upto 100/-(Students residing outside hostel campus)

  ii) Escort Allowance 100/-

  iii) Special Pay allowance for hostel employee as care taker. 100/- As per GR (B, C, D) of additional allowances

  Hearing Impaired All Groups:

  i) Transportation Allowance upto 100/-(Students residing outside hostel campus)

  As per GR (B) of additional allowances

  Locomotor Disability All Groups:

  i) Transportation Allowance upto 100/-(Students residing outside hostel campus)

  As per GR (B) of additional allowances

  Mental Retardation/ Mental Illness All Groups:

  i) Transportation Allowance upto 100/-(Students residing outside hostel campus)

  ii) Escort Allowance 100/-

  iii) Special Pay allowance for hostel employee as care taker. 100/-

  iv) Extra Coaching allowance 150/- As per GR (B, C, D, E) of additional allowances

  Orthopaedic Disability All Groups:

  i) Transportation Allowance upto 100/-(Students residing outside hostel campus)

  ii) Escort Allowance 100/-

  iii) Special Pay allowance for hostel employee as care taker. 100/- As per GR (B, C, D) of additional allowances

  3) In addition to the maintenance allowance all mandatory fees/ compulsory payable fees i.e. (Tuition Fees, Exam Fees & other Fees) by the student to the institutes are covered under this scheme.

  Eligibility for Government of India Post-Matric Scholarship

  1) The parents/Guardian annual income shall be less than or equal to Rs. 2,50,000.

  2) Student category shall belong to Scheduled caste or Navbouddha

  3) Student shall belong to resident of Maharashtra

  4) Student should be passes SSC/equivalent Matric.

  5) Failure: if student fail first time then should avail Exam fees & maintenance allowance. If fails second time in same class then he/she will not get any allowance and after two drops he will pass and go to next class then he will be eligible.

  6) In case of student studying out of Maharashtra then same rules are applicable as per GOI.

  7) Only 2 professional Courses are allowed.

  Documents Required 

  • Income Certificate(Provided by Tahesildar)

  • Cast Certificate.

  • Mark sheet for last appeared examination

  • Mark sheet for SSC or HSC

  • Father date Certificate(if required)

  • Gap & Self Declaration(if required)

  • Hostel Certificate (if required)

  • Husband Income Certificate(if girl is married)

  Apply for Government of India Post-Matric Scholarship

  Leave a Comment